आंतरराष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लखनौ येथे 56 व्या पोलीस महासंचालक/महानिरीक्षक परिषदेला उपस्थिती.

PM-Modi

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2021 : पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे आज  लखनौ येथे आयोजित 56 व्या पोलीस महासंचालक/महानिरीक्षक परिषदेला उपस्थित होते. ही परिषद 20-21 नोव्हेंबर रोजी येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल/ केंद्रीय पोलीस संघटनेचे 62 महासंचालक/महानिरीक्षक उपस्थित होते. याशिवाय, देशभरातील गुप्तचर विभागाच्या कार्यालयांमधून विविध सेवा ज्येष्ठतेच्या 400 हून अधिक अधिकाऱ्यांनी आभासी माध्यमातून सहभाग  घेतला.

माननीय पंतप्रधानांनी परिषदेदरम्यान या चर्चेत भाग घेतला आणि आपल्या अमूल्य सूचना दिल्या. परिषदेपूर्वी, कारागृह सुधारणा, दहशतवाद, डावा कट्टरतावाद, सायबर गुन्हे, अंमली पदार्थांची तस्करी, स्वयंसेवी संस्थांना मिळणारा परदेशी निधी, ड्रोन संबंधित मुद्दे, सीमावर्ती गावांचा विकास इत्यादींसारख्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित महत्वाच्या विषयांच्या प्रमुख पैलूंवर चर्चा करण्यासाठी पोलीस महासंचालकांचे अनेक मुख्य गट तयार करण्यात आले.

आज दुपारी परिषदेच्या सामारोप सत्राला संबोधित करताना पंतप्रधानांनी घडलेल्या घटनेचा अभ्यास करण्यासाठी एक संस्थात्मक यंत्रणा बनवण्याच्या दृष्टीने, पोलिसांशी संबंधित सर्व घटनांचे विश्लेषण आणि अभ्यास करण्याचे आवाहन केले. या परिषदेच्या माध्यमातून  विविध श्रेणींमधील अधिकाऱ्यांमध्ये माहितीचा प्रवाह सुलभ झाला आहे असे  सांगून त्यांनी  संमिश्र स्वरूपात ही परिषद  आयोजित केल्याबद्दल प्रशंसा केली.  देशभरातील पोलिस दलांच्या फायद्यासाठी आंतर-कार्यक्षम तंत्रज्ञान विकसित करण्यावर त्यांनी भर दिला. विशेषत: कोविड महामारीनंतर सामान्य जनतेप्रती पोलिसांच्या दृष्टिकोनात झालेल्या सकारात्मक बदलाचे त्यांनी कौतुक केले. लोकांच्या हितासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करण्याची सूचनाही त्यांनी केली.

2014 मध्ये सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट पोलिसिंग संकल्पनेच्या नियमित आढावा घेण्यावर  त्यांनी भर दिला आणि पोलिस दलांमध्ये सातत्याने परिवर्तन आणि संस्थात्मकीकरणासाठी मार्गदर्शक आराखडा विकसित करण्याची सूचना केली. पोलिसांसमोरील काही दैनंदिन  आव्हानांवर मात करण्यासाठी हॅकाथॉनद्वारे तांत्रिक उपाय शोधण्याच्या दृष्टीने  उच्च तंत्रशिक्षण प्राप्त  तरुणांना सहभागी करून घेण्याचे आवाहन केले.

पंतप्रधानांनी गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकेही प्रदान केली. पंतप्रधानांच्या सूचनेनुसार प्रथमच, विविध राज्यांतील भारतीय पोलीस सेवेतील  अधिकाऱ्यांनी समकालीन सुरक्षेच्या मुद्यांवर आपले लेख सादर करून परिषदेचे महत्त्व वाढवले.

यापूर्वी, 19 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते परिषदेचे उद्‌घाटन करण्यात आले यावेळी त्यांनी देशातील तीन-सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांना चषक प्रदान केले. या परिषदेतील सर्व चर्चांमध्ये  गृहमंत्र्यांनी सहभाग घेऊन आपल्या बहुमोल सूचना आणि  मार्गदर्शन केले.

About the author

ACHUKVARTA

Add Comment

Click here to post a comment

: नविनतम पोस्ट्स :

  • dharmantaranधर्मांतरण, निकाह, एस. सी. व्यक्ती आणि त्याच्या धर्मांतरणासमोरील अडचणी.
    एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ‘कार्डेलिया क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात’ आर्यन खान याला अटक केल्यानंतर त्यांनी अनुसूचित (एस.सी) जातीच्या आधारे मिळवलेली सरकारी नोकरी कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विद्यमान […]
  • Keshvanand-Bharti-Caseभारतीय संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यातील ‘सत्तेचा समतोल’ साधणारा ‘केशवानंद भारती खटला’
        “केशवानंद भारती श्रीपादगलवारू आणि इतर” विरुद्ध “केरळ राज्य आणि इतर” (रिट पिटिशन (सिव्हिल)  135 ऑफ1970), ज्याला‘केशवानंद भारती निर्णय’ म्हणूनही ओळखले जाते, दि. 24 / 4 / 1973 रोजी दिलेला हा भारतीय सर्वोच्च न्यायालयाचा एक […]
  • sanvidhanराज्यघटनेचा ‘आत्मा’.
        ‘भारतीय राज्यघटना’ ( इंडियन कॉन्स्टीट्यूशन ) म्हणजे देशाचा मूलभूत व सर्वश्रेष्ठ कायदा होय. देशाची मूलभूत बैठक निश्चित करणारी, शासनाचे अधिकार आणि जनतेचे हक्क स्पष्ट्र करणारी नियमावली म्हणजे ‘राज्यघटना’ होय. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी भारतीय […]
  • Tandoori-Chai“तंदूरी चाय ” …व्हिडीओ पाहण्यासाठी पोस्टवर क्लिक करा.
    गरमा गरम… “तंदूरी चाय “.    पर्यटकांनी भेट दिलेल्या स्थानाची वा ठिकाणाची स्मृती आपल्याजवळ कायमची राहण्यास तेथील हस्तोद्योगांचे उत्पादन, खाद्य व पेय पदार्थ, कृषी उत्पादन, मृत्तिकाशिल्प, स्मारके इत्यादि कारणीभूत ठरतात. […]
  • १२ आमदारांचे नामनिर्देशन ‘कलम १६३-१’ च्या कैचित !
      भारतीय संविधानाचे कलम १७१ प्रमाणे देण्यात आलेल्या कार्यकारी अधिकारातंर्गत जिथे द्विसदनात्मक शासन आहे तिथे विधानपरिषदेवर साहित्य, कला, विज्ञान आदी क्षेत्रातील काही सदस्यांचे नामनिर्देशन करण्याचा अधिकार त्या-त्या राज्याच्या राज्यपालास असतो. […]
  • माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे ‘‘कलम ६ (३) (एक) आणि (दोन)’’ चा वापर का करावा?
    भ्रष्टाचाराला व खाबूगिरीला लगाम घालावा, पारदर्शक प्रशासन असावे आणि सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील माहिती मिळविण्याची इच्छा असणा-या नागरिकांना विवक्षित माहिती मिळावी यासाठी एक जालीम उपाय म्हणून ‘माहितीचा अधिकार अधिनियम, २००५’ हा कायदा […]
  • Lokadalat‘लोक अदालत’ ची महती !
    ऐकावं ते नवलच आहे. लोक अदालत म्हणजे काय रं भाऊ? लोक अदालत म्हणजे लोकांची अदालत. हे एक असे न्यायालय आहे जिथे तक्रारदार, वादी आणि फिर्यादी यांनी समोरासमोर बसून न्यायिक विशेषज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चर्चा करुन कायद्याला अनुरुप पण सामांजस्याने […]
Saturday
October 1, 2022
Mumbai
Sunrise: 6:29 AM
Sunset: 6:27 PM
Translate »
%d bloggers like this: