मनोरंजन महाराष्ट्र राष्ट्रीय राज्य

दिवाळी, हिवाळी पर्यटन हंगामामध्ये पर्यटकांच्या स्वागतासाठी एमटीडीसी सज्ज.

Pune_MTDC 2

मुंबई, दि. 1 नोव्हेंबर : कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे शासनाने जवळपास सर्वच पर्यटनस्थळे खुली करून पर्यटकांना दिलासा दिला आहे. पर्यटक देखील हिवाळी पर्यटन हंगामासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) पर्यटक निवासाचे आरक्षण करून पर्यटनाचे नियोजन करू लागल्याचे दिसून येत आहे. गुलाबी थंडीची चाहूल आणि दीपावलीच्या सुटीचे वेध लागले असल्याने पर्यटकांची पावले पर्यटनस्थळांकडे वळू लागली असल्याने महामंडळानेही विविध सोयी सुविधा आणि विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. विविध सोयी सुविधांसह पर्यटकांच्या स्वागतासाठी महामंडळ सज्ज असल्याने पर्यटकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पुणे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी केले आहे.

            काही दिवसांपूर्वीच महामंडळाच्या www.mtdc.co या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. या नवीन संकेतस्थळावरून महामंडळाच्या पर्यटक निवासाचे आरक्षण करता येणार आहे. महामंडळाची नुतनीकरण झालेली पर्यटक निवासे आणि प्रशिक्षित कर्मचारी पर्यटकांचा दीपावलीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.   

एमटीडीसीमार्फत विविध घटकांना सवलती :

            महामंडळाने हिवाळी पर्यटन आणि दीपावली सुट्यांसाठी नवनव्या संकल्पना राबविण्याची तयारी केली आहे. पर्यटकांसाठी विविध सवलती जाहीर केल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक, शासकीय कर्मचारी यांना आगाऊ बुकिंगसाठी सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. सामाजिक बांधिलकी जपताना आजी-माजी सैनिक आणि दिव्यांगांसाठी विशेष सवलती दिल्या आहेत. ग्रुप बुकिंगमध्ये 20 खोल्यांपेक्षा जास्त बुकिंग असल्यास सवलत देण्यात येत आहे. शालेय सहलींसाठीही विशेष सवलती देण्यात येत आहेत. याबरोबरच 1 ऑक्टोबरपासून  ‘कॉम्लीमेंटरी ब्रेकफास्ट’ची सुरूवात केली असल्याने पर्यटक आनंद व्यक्त करीत आहेत.

            पर्यटक निवासात पर्यटकांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देताना शासनाने दिलेल्या कोरोना प्रतिबंधक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. उपहारगृह, रिझॉर्ट आणि अनुषंगिक बाबींची तसेच परिसराची काटेकारेपणे स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. पर्यटकांना तातडीच्या वैद्यकीय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून आवश्यकता भासल्यास पर्यटकांच्या मागणीवरून पर्यटक निवासात औषधोपचार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

            महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व पर्यटक निवासांचे आरक्षण सुरू असून www.mtdc.co या संकेतस्थळावर ऑनलाईन आरक्षणही सुरू करण्यात आले आहे, असे श्री. हरणे यांनी सांगितले.

About the author

ACHUKVARTA

Add Comment

Click here to post a comment

: नविनतम पोस्ट्स :

  • dharmantaranधर्मांतरण, निकाह, एस. सी. व्यक्ती आणि त्याच्या धर्मांतरणासमोरील अडचणी.
    एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ‘कार्डेलिया क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात’ आर्यन खान याला अटक केल्यानंतर त्यांनी अनुसूचित (एस.सी) जातीच्या आधारे मिळवलेली सरकारी नोकरी कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विद्यमान […]
  • Keshvanand-Bharti-Caseभारतीय संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यातील ‘सत्तेचा समतोल’ साधणारा ‘केशवानंद भारती खटला’
        “केशवानंद भारती श्रीपादगलवारू आणि इतर” विरुद्ध “केरळ राज्य आणि इतर” (रिट पिटिशन (सिव्हिल)  135 ऑफ1970), ज्याला‘केशवानंद भारती निर्णय’ म्हणूनही ओळखले जाते, दि. 24 / 4 / 1973 रोजी दिलेला हा भारतीय सर्वोच्च न्यायालयाचा एक […]
  • sanvidhanराज्यघटनेचा ‘आत्मा’.
        ‘भारतीय राज्यघटना’ ( इंडियन कॉन्स्टीट्यूशन ) म्हणजे देशाचा मूलभूत व सर्वश्रेष्ठ कायदा होय. देशाची मूलभूत बैठक निश्चित करणारी, शासनाचे अधिकार आणि जनतेचे हक्क स्पष्ट्र करणारी नियमावली म्हणजे ‘राज्यघटना’ होय. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी भारतीय […]
  • Tandoori-Chai“तंदूरी चाय ” …व्हिडीओ पाहण्यासाठी पोस्टवर क्लिक करा.
    गरमा गरम… “तंदूरी चाय “.    पर्यटकांनी भेट दिलेल्या स्थानाची वा ठिकाणाची स्मृती आपल्याजवळ कायमची राहण्यास तेथील हस्तोद्योगांचे उत्पादन, खाद्य व पेय पदार्थ, कृषी उत्पादन, मृत्तिकाशिल्प, स्मारके इत्यादि कारणीभूत ठरतात. […]
  • १२ आमदारांचे नामनिर्देशन ‘कलम १६३-१’ च्या कैचित !
      भारतीय संविधानाचे कलम १७१ प्रमाणे देण्यात आलेल्या कार्यकारी अधिकारातंर्गत जिथे द्विसदनात्मक शासन आहे तिथे विधानपरिषदेवर साहित्य, कला, विज्ञान आदी क्षेत्रातील काही सदस्यांचे नामनिर्देशन करण्याचा अधिकार त्या-त्या राज्याच्या राज्यपालास असतो. […]
  • माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे ‘‘कलम ६ (३) (एक) आणि (दोन)’’ चा वापर का करावा?
    भ्रष्टाचाराला व खाबूगिरीला लगाम घालावा, पारदर्शक प्रशासन असावे आणि सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील माहिती मिळविण्याची इच्छा असणा-या नागरिकांना विवक्षित माहिती मिळावी यासाठी एक जालीम उपाय म्हणून ‘माहितीचा अधिकार अधिनियम, २००५’ हा कायदा […]
  • Lokadalat‘लोक अदालत’ ची महती !
    ऐकावं ते नवलच आहे. लोक अदालत म्हणजे काय रं भाऊ? लोक अदालत म्हणजे लोकांची अदालत. हे एक असे न्यायालय आहे जिथे तक्रारदार, वादी आणि फिर्यादी यांनी समोरासमोर बसून न्यायिक विशेषज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चर्चा करुन कायद्याला अनुरुप पण सामांजस्याने […]
Saturday
October 1, 2022
Mumbai
Sunrise: 6:29 AM
Sunset: 6:27 PM
Translate »
%d bloggers like this: