राष्ट्रीय

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी ‘सिटिझन्स टेली-लॉ मोबाईल अ‍ॅपचा’ केला प्रारंभ.

Tele Law App

नवी दिल्ली, दि. 13 नोव्हेंबर : केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांनी सिटिझन्स टेलि-लॉ मोबाईल अ‍ॅप चा प्रारंभ  केला. यावेळी त्यांनी टेली-लॉ आघाडीच्या कार्यकर्त्यांचाही सत्कार केला.  यावेळी कायदा आणि  न्याय राज्यमंत्री प्रा.एस.पी.सिंग बघेल हे देखील उपस्थित होते.  हा कार्यक्रम 8 ते 14 नोव्हेंबर 2021 या कालावधीत न्याय विभागातर्फे साजरा करण्यात येत असलेल्या आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाचा एक भाग होता.

पंतप्रधानांच्या डिजिटल इंडियाच्या संकल्पनेतून नव  भारत विकसित होत असल्याचे रिजिजू यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.  डिजिटल इंडिया योजनेअंतर्गत, ई-इंटरफेस प्लॅटफॉर्म टेलि लॉ विकसित करण्यात आला आहे.  देशातील खटला दाखल करण्याआधीची यंत्रणा मजबूत करण्याचे हे व्यासपीठ आहे.  सबका प्रयास सबका न्याय हे या व्यासपीठाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.  आझादी का अमृत महोत्सवाच्या काळात, सर्वसामान्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी आणि त्यांना न्याय सहजप्राप्त राहावा यासाठी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.

मेळाव्याला संबोधित करताना, किरेन रिजिजू यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या उत्सवाचा भाग म्हणून सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधल्या 75,000 ग्रामपंचायतींमध्ये टेली-लॉच्या विस्ताराची घोषणा केली.  कायदेविषयक सहाय्य सेवेच्या दिशेने प्राथमिक पाऊल म्हणून वकिलांनी टेली-लॉ चळवळीत सामील होऊन कायदेविषयक  मार्गदर्शन आणि सल्ला देण्याचे आवाहन त्यांनी केले.

टेली-लॉ: रिचिंग द अनरिच्ड ई-इंटरफेस प्लॅटफॉर्म हे व्यासपीठ  2017 मध्ये न्याय विभागाकडून देशात खटला पूर्व यंत्रणा मजबूत करण्यासाठी सुरू करण्यात आले.  हे 633 जिल्ह्यांतील 50,000 ग्रामपंचायतींमधील 51,434 सामायिक सुविधा केंद्रांमध्ये कार्यरत आहे. लाभार्थींना त्यांच्या तक्रारीचे लवकरात लवकर निवारण करण्यासाठी कायदेशीर सल्ला घेण्यासाठी वकिलांच्या पॅनलशी जोडण्यासाठी टेली-लॉ तंत्रज्ञानाचा (उदा. टेलि-व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा) लाभ  होत आहे.

About the author

ACHUKVARTA

Add Comment

Click here to post a comment

: नविनतम पोस्ट्स :

  • dharmantaranधर्मांतरण, निकाह, एस. सी. व्यक्ती आणि त्याच्या धर्मांतरणासमोरील अडचणी.
    एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ‘कार्डेलिया क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात’ आर्यन खान याला अटक केल्यानंतर त्यांनी अनुसूचित (एस.सी) जातीच्या आधारे मिळवलेली सरकारी नोकरी कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विद्यमान […]
  • Keshvanand-Bharti-Caseभारतीय संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यातील ‘सत्तेचा समतोल’ साधणारा ‘केशवानंद भारती खटला’
        “केशवानंद भारती श्रीपादगलवारू आणि इतर” विरुद्ध “केरळ राज्य आणि इतर” (रिट पिटिशन (सिव्हिल)  135 ऑफ1970), ज्याला‘केशवानंद भारती निर्णय’ म्हणूनही ओळखले जाते, दि. 24 / 4 / 1973 रोजी दिलेला हा भारतीय सर्वोच्च न्यायालयाचा एक […]
  • sanvidhanराज्यघटनेचा ‘आत्मा’.
        ‘भारतीय राज्यघटना’ ( इंडियन कॉन्स्टीट्यूशन ) म्हणजे देशाचा मूलभूत व सर्वश्रेष्ठ कायदा होय. देशाची मूलभूत बैठक निश्चित करणारी, शासनाचे अधिकार आणि जनतेचे हक्क स्पष्ट्र करणारी नियमावली म्हणजे ‘राज्यघटना’ होय. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी भारतीय […]
  • Tandoori-Chai“तंदूरी चाय ” …व्हिडीओ पाहण्यासाठी पोस्टवर क्लिक करा.
    गरमा गरम… “तंदूरी चाय “.    पर्यटकांनी भेट दिलेल्या स्थानाची वा ठिकाणाची स्मृती आपल्याजवळ कायमची राहण्यास तेथील हस्तोद्योगांचे उत्पादन, खाद्य व पेय पदार्थ, कृषी उत्पादन, मृत्तिकाशिल्प, स्मारके इत्यादि कारणीभूत ठरतात. […]
  • १२ आमदारांचे नामनिर्देशन ‘कलम १६३-१’ च्या कैचित !
      भारतीय संविधानाचे कलम १७१ प्रमाणे देण्यात आलेल्या कार्यकारी अधिकारातंर्गत जिथे द्विसदनात्मक शासन आहे तिथे विधानपरिषदेवर साहित्य, कला, विज्ञान आदी क्षेत्रातील काही सदस्यांचे नामनिर्देशन करण्याचा अधिकार त्या-त्या राज्याच्या राज्यपालास असतो. […]
  • माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे ‘‘कलम ६ (३) (एक) आणि (दोन)’’ चा वापर का करावा?
    भ्रष्टाचाराला व खाबूगिरीला लगाम घालावा, पारदर्शक प्रशासन असावे आणि सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील माहिती मिळविण्याची इच्छा असणा-या नागरिकांना विवक्षित माहिती मिळावी यासाठी एक जालीम उपाय म्हणून ‘माहितीचा अधिकार अधिनियम, २००५’ हा कायदा […]
  • Lokadalat‘लोक अदालत’ ची महती !
    ऐकावं ते नवलच आहे. लोक अदालत म्हणजे काय रं भाऊ? लोक अदालत म्हणजे लोकांची अदालत. हे एक असे न्यायालय आहे जिथे तक्रारदार, वादी आणि फिर्यादी यांनी समोरासमोर बसून न्यायिक विशेषज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चर्चा करुन कायद्याला अनुरुप पण सामांजस्याने […]
Thursday
September 21, 2023
Mumbai
Sunrise: 6:27 AM
Sunset: 6:36 PM
Translate »
%d bloggers like this: