आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय राज्य

52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- ईफ्फीसाठी प्रसार माध्यम प्रतिनिधींसाठीची नोंदणी प्रक्रिया सुरु.

IFFI

जगभरातील 300 हून अधिक चित्रपट यंदाच्या 52 व्या इफ्फीमधे होणार प्रदर्शित.

पणजी/मुंबई/नवी दिल्‍ली, 20 ऑक्टोबर 2021 : 52 वा  भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- इफ्फी (IFFI) 20-28 नोव्हेंबर 2021 या कालावधीत गोव्यात होणार आहे. सध्याची कोविड -19 ची  परिस्थिती लक्षात घेता, 52 वा इफ्फी (IFFI) मिश्र( हायब्रीड) स्वरूपात आयोजित केला जाईल.

जगभरातील सर्वोत्कृष्ट समकालीन आणि अभिजात चित्रपटांचा व्यापकआणि  विविधांगी पट इफ्फीत मांडला जातो. जगप्रसिद्ध चित्रपट निर्माते, अभिनेते, तंत्रज्ञ, समीक्षक, शिक्षणतज्ज्ञ आणि चित्रपट रसिकांचे महोत्सवात स्वागत केले जाते. चित्रपटांचे सादरीकरण, वर्ग, परिचर्चा, सहनिर्मिती, परिसंवाद इत्यादींच्या माध्यमातून हा चित्रपट आणि कलेचा सोहळा साजरा केला जातो.

52 व्या इफ्फीमधे सहभागी होऊ इच्छिणारे माध्यम प्रतिनिधी पुढिल दुव्यावर अर्थात लिंकवर ऑनलाइन नोंदणी करू शकतात. https://my.iffigoa.org/extranet/media/ लिंकमधे नमूद केलेल्या पत्र सूचना कार्यालयाच्या (पीआयबी) मार्गदर्शक सूचनांनुसार माध्यमांना प्रवेशासाठी अनुमती दिली जाईल.

अर्जदारांचे वय 1 जानेवारी, 2021 रोजी  21 वर्षांपेक्षा जास्त असावे आणि त्यांना इफ्फीसारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांच्या बातमीदारीचा किमान तीन वर्षांचा व्यावसायिक अनुभव असावा.

जनहितार्थ, अर्जदाराने कोविड-19 प्रतिबंधक लस घेतलेली असावी अशी शिफारस आहे.  लसीची एक किंवा दोन्ही मात्रा घेतलेले प्रतिनिधी नोंदणी पोर्टलवर त्यांचे लसीकरण प्रमाणपत्र अपलोड करू शकतात. 14 नोव्हेंबर 2021 च्या मध्यरात्री नोंदणी प्रक्रिया बंद होईल.

ऑनलाइन सहभागाच्या संधी

या वर्षी जानेवारीत झालेल्या 51 व्या इफ्फीप्रमाणेच, 52 व्या महोत्सवातही  संबंधित उपक्रमांना आभासी माध्यमातून उपस्थित राहण्याची संधी उपलब्ध केली जाणार आहे.  अनेक चित्रपट ऑनलाइन प्रदर्शित केले जाणार आहेत. इफ्फी संदर्भात पत्र सूचना कार्यालयाद्वारे (पीआयबी) आयोजित सर्व पत्रकार परिषदा पीआयबीच्या युट्यूब वाहिनी youtube.com/pibindia वर थेट-प्रसारित होतील. पत्रकारांना इथे ऑनलाईन प्रश्न विचारण्याची सुविधा असेल. आभासी व्यासपीठासाठीची नोंदणी प्रक्रीया लवकरच जाहीर केली जाईल.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा चित्रपट महोत्सव संचालनालय आणि गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित केला जातो.

52व्या इफ्फीसंबंधित सर्व अद्ययावत माहिती महोत्सवाचे संकेतस्थळ www.iffigoa.org, पीआयबी संकेतस्थळ (pib.gov.in), तसेच इफ्फीचे समाजमाध्यम (सोशल मिडिया) हँडल ट्विटर, फेसबूक आणि इन्स्टाग्राम त्याचबरोबर पीआयबी गोव्याच्याही समाजमाध्यम हँडल्सवर मिळू शकते.

About the author

ACHUKVARTA

Add Comment

Click here to post a comment

: नविनतम पोस्ट्स :

  • dharmantaranधर्मांतरण, निकाह, एस. सी. व्यक्ती आणि त्याच्या धर्मांतरणासमोरील अडचणी.
    एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ‘कार्डेलिया क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात’ आर्यन खान याला अटक केल्यानंतर त्यांनी अनुसूचित (एस.सी) जातीच्या आधारे मिळवलेली सरकारी नोकरी कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विद्यमान […]
  • Keshvanand-Bharti-Caseभारतीय संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यातील ‘सत्तेचा समतोल’ साधणारा ‘केशवानंद भारती खटला’
        “केशवानंद भारती श्रीपादगलवारू आणि इतर” विरुद्ध “केरळ राज्य आणि इतर” (रिट पिटिशन (सिव्हिल)  135 ऑफ1970), ज्याला‘केशवानंद भारती निर्णय’ म्हणूनही ओळखले जाते, दि. 24 / 4 / 1973 रोजी दिलेला हा भारतीय सर्वोच्च न्यायालयाचा एक […]
  • sanvidhanराज्यघटनेचा ‘आत्मा’.
        ‘भारतीय राज्यघटना’ ( इंडियन कॉन्स्टीट्यूशन ) म्हणजे देशाचा मूलभूत व सर्वश्रेष्ठ कायदा होय. देशाची मूलभूत बैठक निश्चित करणारी, शासनाचे अधिकार आणि जनतेचे हक्क स्पष्ट्र करणारी नियमावली म्हणजे ‘राज्यघटना’ होय. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी भारतीय […]
  • Tandoori-Chai“तंदूरी चाय ” …व्हिडीओ पाहण्यासाठी पोस्टवर क्लिक करा.
    गरमा गरम… “तंदूरी चाय “.    पर्यटकांनी भेट दिलेल्या स्थानाची वा ठिकाणाची स्मृती आपल्याजवळ कायमची राहण्यास तेथील हस्तोद्योगांचे उत्पादन, खाद्य व पेय पदार्थ, कृषी उत्पादन, मृत्तिकाशिल्प, स्मारके इत्यादि कारणीभूत ठरतात. […]
  • १२ आमदारांचे नामनिर्देशन ‘कलम १६३-१’ च्या कैचित !
      भारतीय संविधानाचे कलम १७१ प्रमाणे देण्यात आलेल्या कार्यकारी अधिकारातंर्गत जिथे द्विसदनात्मक शासन आहे तिथे विधानपरिषदेवर साहित्य, कला, विज्ञान आदी क्षेत्रातील काही सदस्यांचे नामनिर्देशन करण्याचा अधिकार त्या-त्या राज्याच्या राज्यपालास असतो. […]
  • माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे ‘‘कलम ६ (३) (एक) आणि (दोन)’’ चा वापर का करावा?
    भ्रष्टाचाराला व खाबूगिरीला लगाम घालावा, पारदर्शक प्रशासन असावे आणि सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील माहिती मिळविण्याची इच्छा असणा-या नागरिकांना विवक्षित माहिती मिळावी यासाठी एक जालीम उपाय म्हणून ‘माहितीचा अधिकार अधिनियम, २००५’ हा कायदा […]
  • Lokadalat‘लोक अदालत’ ची महती !
    ऐकावं ते नवलच आहे. लोक अदालत म्हणजे काय रं भाऊ? लोक अदालत म्हणजे लोकांची अदालत. हे एक असे न्यायालय आहे जिथे तक्रारदार, वादी आणि फिर्यादी यांनी समोरासमोर बसून न्यायिक विशेषज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चर्चा करुन कायद्याला अनुरुप पण सामांजस्याने […]
Saturday
October 1, 2022
Mumbai
Sunrise: 6:29 AM
Sunset: 6:27 PM
Translate »
%d bloggers like this: