नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर 2021 : महाराष्ट्र विधानपरिषदेत एक आकस्मिक रिक्त झालेली जागा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सदस्यांद्वारे भरली जाणार आहे.रिक्त पदाचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
अनु क्र. | सदस्याचे नाव | निवडणुकीचे स्वरूप | तारीख आणि रिक्त जागा झाल्याचे कारण | मुदत पर्यंत |
1 | श्री. शरद नामदेव रणपिसे | विधानसभा सदस्यांच्या माध्यमातून | 23.09.2021 मृत्यू | 27.07.2024 |
2. आयोगाने खालील नियोजित वेळापत्रकानुसार उपरोक्त रिक्त जागा भरण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांद्वारे महाराष्ट्र विधानपरिषदेची पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे:
अनु क्र. | निवडणुकीचा कार्यक्रम | तारीख |
1 | अधिसूचना जारी करणे | 9 नोव्हेंबर, 2021 (मंगळवार) |
2 | उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख | 16 नोव्हेंबर, 2021 (मंगळवार) |
3 | उमेदवारी अर्जांची छाननी | 17 नोव्हेंबर, 2021 (बुधवार) |
4 | उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख | 22 नोव्हेंबर, 2021 (सोमवार) |
5 | मतदानाची तारीख | 29 नोव्हेंबर, 2021 (सोमवार) |
6 | मतदानाची वेळ | सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत |
7 | मतमोजणी | 29 नोव्हेंबर 2021 (सोमवार) संध्याकाळी 05:00 वाजता |
8 | निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याची तारीख | 1 डिसेंबर 2021 (बुधवार) |
3.कोविड-19 ची विस्तृत मार्गदर्शक तत्त्वे, भारत निवडणूक आयोगाने यापूर्वीच जारी केली आहेत तसेच भारत निवडणूक आयोगाने अलीकडे केलेली मार्गदर्शक तत्त्वे 28.09.2021 च्या प्रसिद्धिपत्रकाच्या 06 व्या परिच्छेदात समाविष्ट असून https://eci.gov.in/candidate-political-parties/instructions-on-covid-19/. या लिंकवर उपलब्ध आहेत. सर्व व्यक्तींसाठी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान, ही मार्गदर्शक तत्वे लागू असतील त्याचे त्यांनी पालन करावे.
4.निवडणूक आयोजित करताना कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत विद्यमान सूचनांचे पालन केले जात आहे का हे सुनिश्चित करण्यासाठी राज्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्य सचिव, महाराष्ट्र यांना देण्यात आले आहेत.
Add Comment