राष्ट्रीय

मुंबई टपाल विभागाकडून “तुमच्या पोस्टमनविषयी जाणून घ्या” या मोबाईल अॅपचा आरंभ.

Know Your Postman App

मुंबई शहर आणि उपनगरांतील 86,000 पेक्षा अधिक क्षेत्रांची माहिती अॅपवर उपलब्ध

मुंबई, 16 ऑक्टोबर 2021 : मुंबई टपाल विभाग यांच्याकडून आज “तुमच्या पोस्टमनविषयी जाणून घ्या” (Know your Postman) या मोबाईल अॅपचा आरंभ करण्यात आला. पोस्टमास्तर जनरल श्रीमती स्वाती पांडे यांची याप्रसंगी उपस्थिती होती. त्यांच्याच संकल्पनेतून या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे.

मुंबई टपाल विभागाने तयार केलेल्या या अनोख्या अॅपच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या क्षेत्रातील पोस्टमनविषयी तपशील उपलब्ध होणार आहे. क्षेत्राचे नाव, टपाल कार्यालयाचे नाव आणि पिनकोडच्या माध्यमातून मुंबई शहर आणि उपनगरांतील 86,000 पेक्षा अधिक क्षेत्रांची माहिती या अॅपवर उपलब्ध आहे. मोबाईल अॅप  https://cutt.ly/kypmr या लिंकच्या माध्यमातून गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करता येईल. जर एखादा पत्ता यावर उपलब्ध झाला नाही तर तो पत्ता तात्काळ टपाल खात्याला कळवून 24 तासाच्या आत अद्ययावत केला जाईल.

मुंबई शहरात 89 टपाल कार्यालये आहेत, ज्यात 2000 पोस्टमन (महिला आणि पुरुष) यांच्याकडे मोबाईल उपलब्ध आहे. मुंबई शहरात दररोज सुमारे 2 ते 2.5 लाख टपाल साहित्य ज्यात स्पीड पोस्ट, रजिस्टर्ड पोस्ट, आधार कार्ड, पासपोर्टचे वितरण केले जाते.

मुंबई टपाल विभागाने “तुमच्या पोस्टमनविषयी जाणून घ्या” ही सुविधा सुरु केली आहे. यात पोस्टमन तपशील, संपर्क क्रमांक, संबंधित टपाल कार्यालयाचा तपशील आणि संपर्क क्रमांक व पत्ता उपलब्ध आहे. यामुळे नागरिकांना टपाल व्यवहार करणे सुलभ होणार आहे.

About the author

ACHUKVARTA

Add Comment

Click here to post a comment

: नविनतम पोस्ट्स :

  • dharmantaranधर्मांतरण, निकाह, एस. सी. व्यक्ती आणि त्याच्या धर्मांतरणासमोरील अडचणी.
    एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ‘कार्डेलिया क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात’ आर्यन खान याला अटक केल्यानंतर त्यांनी अनुसूचित (एस.सी) जातीच्या आधारे मिळवलेली सरकारी नोकरी कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विद्यमान […]
  • Keshvanand-Bharti-Caseभारतीय संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यातील ‘सत्तेचा समतोल’ साधणारा ‘केशवानंद भारती खटला’
        “केशवानंद भारती श्रीपादगलवारू आणि इतर” विरुद्ध “केरळ राज्य आणि इतर” (रिट पिटिशन (सिव्हिल)  135 ऑफ1970), ज्याला‘केशवानंद भारती निर्णय’ म्हणूनही ओळखले जाते, दि. 24 / 4 / 1973 रोजी दिलेला हा भारतीय सर्वोच्च न्यायालयाचा एक […]
  • sanvidhanराज्यघटनेचा ‘आत्मा’.
        ‘भारतीय राज्यघटना’ ( इंडियन कॉन्स्टीट्यूशन ) म्हणजे देशाचा मूलभूत व सर्वश्रेष्ठ कायदा होय. देशाची मूलभूत बैठक निश्चित करणारी, शासनाचे अधिकार आणि जनतेचे हक्क स्पष्ट्र करणारी नियमावली म्हणजे ‘राज्यघटना’ होय. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी भारतीय […]
  • Tandoori-Chai“तंदूरी चाय ” …व्हिडीओ पाहण्यासाठी पोस्टवर क्लिक करा.
    गरमा गरम… “तंदूरी चाय “.    पर्यटकांनी भेट दिलेल्या स्थानाची वा ठिकाणाची स्मृती आपल्याजवळ कायमची राहण्यास तेथील हस्तोद्योगांचे उत्पादन, खाद्य व पेय पदार्थ, कृषी उत्पादन, मृत्तिकाशिल्प, स्मारके इत्यादि कारणीभूत ठरतात. […]
  • १२ आमदारांचे नामनिर्देशन ‘कलम १६३-१’ च्या कैचित !
      भारतीय संविधानाचे कलम १७१ प्रमाणे देण्यात आलेल्या कार्यकारी अधिकारातंर्गत जिथे द्विसदनात्मक शासन आहे तिथे विधानपरिषदेवर साहित्य, कला, विज्ञान आदी क्षेत्रातील काही सदस्यांचे नामनिर्देशन करण्याचा अधिकार त्या-त्या राज्याच्या राज्यपालास असतो. […]
  • माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे ‘‘कलम ६ (३) (एक) आणि (दोन)’’ चा वापर का करावा?
    भ्रष्टाचाराला व खाबूगिरीला लगाम घालावा, पारदर्शक प्रशासन असावे आणि सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील माहिती मिळविण्याची इच्छा असणा-या नागरिकांना विवक्षित माहिती मिळावी यासाठी एक जालीम उपाय म्हणून ‘माहितीचा अधिकार अधिनियम, २००५’ हा कायदा […]
  • Lokadalat‘लोक अदालत’ ची महती !
    ऐकावं ते नवलच आहे. लोक अदालत म्हणजे काय रं भाऊ? लोक अदालत म्हणजे लोकांची अदालत. हे एक असे न्यायालय आहे जिथे तक्रारदार, वादी आणि फिर्यादी यांनी समोरासमोर बसून न्यायिक विशेषज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चर्चा करुन कायद्याला अनुरुप पण सामांजस्याने […]
Saturday
October 1, 2022
Mumbai
Sunrise: 6:29 AM
Sunset: 6:27 PM
Translate »
%d bloggers like this: