आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय

भारत-ब्रिटन दरम्यान ‘कोकण शक्ती 2021’ या पहिल्या त्रि-सेवा सरावाचा सागरी टप्पा पूर्ण जोमात.

Tri-Service

नवी दिल्ली,  26 ऑक्टोबर 2021 : भारत आणि ब्रिटनच्या सशस्त्र दलांदरम्यान ‘कोकण शक्ती 2021’ या पहिल्या त्रि-सेवा सरावाचा सागरी टप्पा अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीवर आयोजित करण्यात आला आहे. बंदर नियोजनाचा टप्पा पूर्ण झाल्यावर, सरावाचा सागरी टप्पा 24 ऑक्टोबर 2021 रोजी सुरू झाला. तो 27 ऑक्टोबर  2021  पर्यंत चालेल.

पूर्व-नियुक्त ठिकाणी लष्कराच्या भू-सैन्यांना उतरवण्यासाठी समुद्रात  नियंत्रण  साध्य करण्याच्या उद्देशाने सर्व सहभागी युनिट्सना  दोन विरोधी सैन्यात विभागले  होते. एका दलाचे नेतृत्व पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग करत होते आणि त्यात आयएनएस  चेन्नई ,  भारतीय नौदलाच्या इतर युद्धनौका आणि रॉयल नेव्हीचे टाइप 23 फ्रिगेट एचएमएस रिचमंड यांचा समावेश होता. यूके कॅरियर स्ट्राइक ग्रुप अंतर्गत कार्यरत अन्य  दलात विमानवाहू जहाज, एचएमएस  क्वीन एलिझाबेथ, ब्रिटन  आणि नेदरलँडची इतर  नौदल जहाजे आणि भारतीय युद्धनौका यांचा समावेश होता.

दोन्ही दलांनी  त्यांच्या गटांमध्ये सागरी मार्गावर कर्मचारी आणि अन्य सामुग्रीची अदलाबदल,  हवेत लढाऊ विमानांद्वारे (MiG 29Ks आणि F35Bs) हल्ले ,  हेलिकॉप्टरचे क्रॉस कंट्रोल (सी किंग, चेतक आणि वाइल्डकॅट), समुद्रातील युद्धसदृश स्थितीत  मार्गक्रमण , हवेतील  लक्ष्यांवर बंदुकीच्या फैरी यांसारखे सराव केले.  लष्करी तुकड्यांचे सिम्युलेटेड इंडक्शन देखील करण्यात  आले, त्यानंतर संयुक्त कमांड ऑपरेशन सेंटरची स्थापना करण्यात आली. त्यानंतर, दोन्ही दले   हवाई आणि पृष्ठभागावरील सरावांसाठी  समुद्रात भेटले.

हवाई हल्ल्यांमध्ये भारतीय सागरी गस्ती विमान (एमपीए) डॉर्नियर, भारतीय नौदल (मिग 29 के), रॉयल नेव्ही (एफ35बी) आणि भारतीय वायुसेना (एसयू-30 आणि जग्वार्स) च्या लढाऊ विमानांचा तसेच संयुक्त फ्लाय पास्ट  यांचा समावेश होता.  रॉयल नेव्हीद्वारे संचलित, भारतीय स्कॉर्पीन श्रेणीची पाणबुडी आणि पाण्याखालील रिमोट कंट्रोल वेहिकल EMATT सह पाण्याच्या पृष्ठभागाखाली  रात्रभर सराव करण्यात आला. भारताचे   P8I सागरी गस्ती विमान  देखील सरावात सहभागी  झाले होते.

About the author

ACHUKVARTA

Add Comment

Click here to post a comment

: नविनतम पोस्ट्स :

  • dharmantaranधर्मांतरण, निकाह, एस. सी. व्यक्ती आणि त्याच्या धर्मांतरणासमोरील अडचणी.
    एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ‘कार्डेलिया क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात’ आर्यन खान याला अटक केल्यानंतर त्यांनी अनुसूचित (एस.सी) जातीच्या आधारे मिळवलेली सरकारी नोकरी कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विद्यमान […]
  • Keshvanand-Bharti-Caseभारतीय संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यातील ‘सत्तेचा समतोल’ साधणारा ‘केशवानंद भारती खटला’
        “केशवानंद भारती श्रीपादगलवारू आणि इतर” विरुद्ध “केरळ राज्य आणि इतर” (रिट पिटिशन (सिव्हिल)  135 ऑफ1970), ज्याला‘केशवानंद भारती निर्णय’ म्हणूनही ओळखले जाते, दि. 24 / 4 / 1973 रोजी दिलेला हा भारतीय सर्वोच्च न्यायालयाचा एक […]
  • sanvidhanराज्यघटनेचा ‘आत्मा’.
        ‘भारतीय राज्यघटना’ ( इंडियन कॉन्स्टीट्यूशन ) म्हणजे देशाचा मूलभूत व सर्वश्रेष्ठ कायदा होय. देशाची मूलभूत बैठक निश्चित करणारी, शासनाचे अधिकार आणि जनतेचे हक्क स्पष्ट्र करणारी नियमावली म्हणजे ‘राज्यघटना’ होय. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी भारतीय […]
  • Tandoori-Chai“तंदूरी चाय ” …व्हिडीओ पाहण्यासाठी पोस्टवर क्लिक करा.
    गरमा गरम… “तंदूरी चाय “.    पर्यटकांनी भेट दिलेल्या स्थानाची वा ठिकाणाची स्मृती आपल्याजवळ कायमची राहण्यास तेथील हस्तोद्योगांचे उत्पादन, खाद्य व पेय पदार्थ, कृषी उत्पादन, मृत्तिकाशिल्प, स्मारके इत्यादि कारणीभूत ठरतात. […]
  • १२ आमदारांचे नामनिर्देशन ‘कलम १६३-१’ च्या कैचित !
      भारतीय संविधानाचे कलम १७१ प्रमाणे देण्यात आलेल्या कार्यकारी अधिकारातंर्गत जिथे द्विसदनात्मक शासन आहे तिथे विधानपरिषदेवर साहित्य, कला, विज्ञान आदी क्षेत्रातील काही सदस्यांचे नामनिर्देशन करण्याचा अधिकार त्या-त्या राज्याच्या राज्यपालास असतो. […]
  • माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे ‘‘कलम ६ (३) (एक) आणि (दोन)’’ चा वापर का करावा?
    भ्रष्टाचाराला व खाबूगिरीला लगाम घालावा, पारदर्शक प्रशासन असावे आणि सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील माहिती मिळविण्याची इच्छा असणा-या नागरिकांना विवक्षित माहिती मिळावी यासाठी एक जालीम उपाय म्हणून ‘माहितीचा अधिकार अधिनियम, २००५’ हा कायदा […]
  • Lokadalat‘लोक अदालत’ ची महती !
    ऐकावं ते नवलच आहे. लोक अदालत म्हणजे काय रं भाऊ? लोक अदालत म्हणजे लोकांची अदालत. हे एक असे न्यायालय आहे जिथे तक्रारदार, वादी आणि फिर्यादी यांनी समोरासमोर बसून न्यायिक विशेषज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चर्चा करुन कायद्याला अनुरुप पण सामांजस्याने […]
Saturday
October 1, 2022
Mumbai
Sunrise: 6:29 AM
Sunset: 6:27 PM
Translate »
%d bloggers like this: