‘त्रिकोणी पानांच्या फणसाचे रोप (ट्रायलोब्ड जॅकफ्रुट प्लांट)’
फणसाची (जॅकफ्रूटची) रोपेकधीतरी गमतीशीर वाढलेली आपल्याला दिसतात. त्याचे कारण म्हणजे आमच्या घराच्या बालकनीतील कुंडीमध्ये एकाच फळाच्या दोन बियांपासून रुजलेल्या दोन फणसांच्या रोपांपैकी एका रोपाची काही पाने त्रिकोणी (ट्रायलोब्ड) प्रकारची आली आहेत. ही पाने दिसायला खूपच सुंदर, मनमोहक आणि आकर्षक आहेत. परंतु फणसाची हीच रोपे त्यांच्या तारुण्यात त्यांचे मूळ स्वरूप धारण करतात आणि पुढे इतर सर्वसामान्य फणसाच्या पांनांसारखीच ही झाडे वाढताना दिसू लागतात. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून फणसाच्या पानांना मिळालेले हे दुर्मिळ स्वरुप हे केवळ त्या रोपाला मिळालेल्या किंवा पुरविले गेलेल्या सुर्य प्रकाशाचा / उर्जेचा परिणाम आहे, असेच म्हणावे लागेल.
फणसाच्या त्रिकोनी (तीन लोब) पाने असलेल्याएकाच फळापासूनच्या ‘बी’पासून रुजलेल्या या रोपाने नुकतेच सावलीतून प्रकाशापर्यंतच्या दिशेनेत्रिकोणी पानांचे स्वरुप धारण केलेले पहायला मिळाले. या फणसाचीप्रजाती मूळची थाई(चीन) या प्रदेशातील आहे,असे सांगितले जाते.
१६५६मध्ये चीनबद्दलच्या प्राचीन इतिहासाच्या पुस्तकांपैकी एक ‘जेसुइट मिशनरी’ या पुस्तकातपुस्तकाचे लेखक मायकेल बॉयम यांनी काटेरी फणसाचे (जॅकफ्रूटचे) झाड सचित्रीत केले आहे.
-सुभाष राजाराम आचरेकर, वांद्रे(पूर्व), मुंबई-५१.
Add Comment