महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा राष्ट्रीय राज्य

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने टोकियो 2020 पॅरालिम्पिक पदक विजेते आणि भारतीय पथकातील सदस्यांचा केला सत्कार.

Paralympic medal winners
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण  राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संपूर्ण भारतीय पॅरालिम्पिक दलाचे टोकियो 2020 पॅरालिम्पिकमध्ये देशासाठी उत्तम कामगिरी केल्याबद्दल आणि विक्रमी संख्येने पदके जिंकल्याबद्दल अभिनंदन केले.

मंत्रालयाने प्रथमच पॅरालिम्पिक विजेत्यांना रोख पुरस्कार दिले.

नवी दिल्ली, २० सप्टेंबर, २००१०(पीआयबी) : सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण  राज्यमंत्री रामदास आठवले यांनी टोकियो 2020 मधील  पॅरालिम्पिक पदक विजेते आणि भारतीय दलातील  इतर खेळाडू  आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा आज नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात सत्कार  केला.

केंद्रीय मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार यांनी सर्व पदकविजेत्यांचे आणि भारतीय पॅरालिम्पिक दलातील  प्रत्येक सदस्याचे त्यांनी देशाला  गौरव मिळवून देण्यासाठी केलेल्या सर्वोत्कृष्ट  प्रयत्नाबद्दल अभिनंदन केले. जागतिक पातळीवर उत्तम कामगिरी करू शकणारे  दिव्यांग क्रीडापटू घडवण्यात  महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल त्यांनी भारतीय पॅरालिम्पिक संघाच्या प्रशिक्षकांचेही आभार मानले.

दिव्यांग क्रीडापटू, त्यांचे प्रशिक्षक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे पॅरालिम्पिक खेळांचा विकास  व्हावा  आणि पुढील पॅरालिम्पिकमध्ये भारतीय पदकांची संख्या दुप्पट व्हावी, अशी आकांक्षा त्यांनी व्यक्त केली.

राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संपूर्ण भारतीय पॅरालिम्पिक दलाचे   टोकियो  2020 पॅरालिम्पिकमध्ये देशासाठी उत्तम कामगिरी केल्याबद्दल आणि विक्रमी संख्येने पदके जिंकल्याबद्दल  अभिनंदन केले.

सामाजिक न्याय आणि मंत्रालयाने प्रथमच पॅरालिम्पिक विजेत्यांना रोख पुरस्कार प्रदान  केले.  सामाजिक न्याय आणि  सक्षमीकरण मंत्र्यांनी सुवर्णपदकासाठी 10 लाख रुपये, रौप्यपदकासाठी 8 लाख रुपये आणि कांस्यपदक विजेत्यांना 5 लाख रुपये रोख पारितोषिक जाहीर केले होते. रोख पुरस्कार  खेळाडूंच्या थेट बँक खात्यात जमा केला  जाईल.

About the author

ACHUKVARTA

Add Comment

Click here to post a comment

: नविनतम पोस्ट्स :

  • dharmantaranधर्मांतरण, निकाह, एस. सी. व्यक्ती आणि त्याच्या धर्मांतरणासमोरील अडचणी.
    एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ‘कार्डेलिया क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात’ आर्यन खान याला अटक केल्यानंतर त्यांनी अनुसूचित (एस.सी) जातीच्या आधारे मिळवलेली सरकारी नोकरी कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विद्यमान […]
  • Keshvanand-Bharti-Caseभारतीय संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यातील ‘सत्तेचा समतोल’ साधणारा ‘केशवानंद भारती खटला’
        “केशवानंद भारती श्रीपादगलवारू आणि इतर” विरुद्ध “केरळ राज्य आणि इतर” (रिट पिटिशन (सिव्हिल)  135 ऑफ1970), ज्याला‘केशवानंद भारती निर्णय’ म्हणूनही ओळखले जाते, दि. 24 / 4 / 1973 रोजी दिलेला हा भारतीय सर्वोच्च न्यायालयाचा एक […]
  • sanvidhanराज्यघटनेचा ‘आत्मा’.
        ‘भारतीय राज्यघटना’ ( इंडियन कॉन्स्टीट्यूशन ) म्हणजे देशाचा मूलभूत व सर्वश्रेष्ठ कायदा होय. देशाची मूलभूत बैठक निश्चित करणारी, शासनाचे अधिकार आणि जनतेचे हक्क स्पष्ट्र करणारी नियमावली म्हणजे ‘राज्यघटना’ होय. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी भारतीय […]
  • Tandoori-Chai“तंदूरी चाय ” …व्हिडीओ पाहण्यासाठी पोस्टवर क्लिक करा.
    गरमा गरम… “तंदूरी चाय “.    पर्यटकांनी भेट दिलेल्या स्थानाची वा ठिकाणाची स्मृती आपल्याजवळ कायमची राहण्यास तेथील हस्तोद्योगांचे उत्पादन, खाद्य व पेय पदार्थ, कृषी उत्पादन, मृत्तिकाशिल्प, स्मारके इत्यादि कारणीभूत ठरतात. […]
  • १२ आमदारांचे नामनिर्देशन ‘कलम १६३-१’ च्या कैचित !
      भारतीय संविधानाचे कलम १७१ प्रमाणे देण्यात आलेल्या कार्यकारी अधिकारातंर्गत जिथे द्विसदनात्मक शासन आहे तिथे विधानपरिषदेवर साहित्य, कला, विज्ञान आदी क्षेत्रातील काही सदस्यांचे नामनिर्देशन करण्याचा अधिकार त्या-त्या राज्याच्या राज्यपालास असतो. […]
  • माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे ‘‘कलम ६ (३) (एक) आणि (दोन)’’ चा वापर का करावा?
    भ्रष्टाचाराला व खाबूगिरीला लगाम घालावा, पारदर्शक प्रशासन असावे आणि सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील माहिती मिळविण्याची इच्छा असणा-या नागरिकांना विवक्षित माहिती मिळावी यासाठी एक जालीम उपाय म्हणून ‘माहितीचा अधिकार अधिनियम, २००५’ हा कायदा […]
  • Lokadalat‘लोक अदालत’ ची महती !
    ऐकावं ते नवलच आहे. लोक अदालत म्हणजे काय रं भाऊ? लोक अदालत म्हणजे लोकांची अदालत. हे एक असे न्यायालय आहे जिथे तक्रारदार, वादी आणि फिर्यादी यांनी समोरासमोर बसून न्यायिक विशेषज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चर्चा करुन कायद्याला अनुरुप पण सामांजस्याने […]
Saturday
October 1, 2022
Mumbai
Sunrise: 6:29 AM
Sunset: 6:27 PM
Translate »
%d bloggers like this: