सामाजिक व कायदाविषयक कायदाविषयक ब्लॉग

मोटार वाहन कायद्यात मोठा बदल…‘हिट अँड रन’ अपघातामधील भरपाईत वाढ !

‘हिट अँड रन’ अपघातामधील मयत पीडितांना केंद्र सरकारची रु.२,००,०००/- तर जबर दुखापत झालेल्या पीडिताला रु.५०,०००/- इतकी भरपाई रक्कम मिळणार !

जिथेअपघात झलेल्यावाहनांची ओळखसापडत नाहीअशा प्रकरणांनाहिट अँडरनप्रकरणे म्हणतात. अशाहिटअँड रनपीडितांनाशासनाने तयारकेलेल्या सांत्वननिधीतून (सोलाटियमफंडातून) निश्चितभरपाई दिलीजाते. ही मदत मिळविण्याकरिता इतकेच दाखवले जाणे आवश्यकआहे कीज्या मोटारवाहनामुळे अपघात झाला त्याची ओळखशोधली जाऊशकत नाहीकिंवा वाजवीप्रयत्नांनंतरही ती निश्चित केली जाऊशकत नाही, याचा अर्थअसा होतोकी अपघातझालेल्या व्यक्तीलाकाही अज्ञातवाहनाने धडकदिल्याने अपघातझाला आणिअपघात करणारेवाहन पळूनगेले.

मोटारवाहन कायदा, १९८८ याजुन्या कायद्याच्याकलम १६१च्या तरतुदीनुसारठोकर मारुन पळूनगेलेल्या मोटारवाहनामुळे घडून आलेल्या अपघातामुळेकोणत्याही व्यक्तीचा मृत्यूझाल्याच्या बाबतीत, पंचवीस हजार रुपयेइतकी नियतरक्कम; तरकोणत्याही व्यक्तीला जबर दुखापत झाल्याच्याबाबतीत, बाराहजार आणिपाचशे रुपयेइतकी नियतरक्कम यापूर्वी मिळत होती.

परंतु, आता मोटारवाहन कायदा, १९८८ मध्येआणखी सुधारणाकरण्यासाठी दिनांक ऑगस्ट, २०१९पासून ‘मोटारवाहने (सुधारणा) कायदा, २०१९’हा नवाकायदा अंमलातआला आहे. यात ठोकरमारुन पळून गेलेल्यामोटार वाहनांमुळेघडलेल्या अपघाताच्याप्रकरणांतील भरपाई म्हणून विशेष तरतूदकरण्यात आलीआहे. यानव्या कायद्याच्याकलम १६१च्या तरतुदीनुसार, ठोकर मारुन पळूनगेलेल्या मोटारवाहनामुळे घडून आलेल्या अपघातामुळे,

(कोणत्याहीव्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या बाबतीत, दोनलाख रुपयेइतकी नियतरक्कम किंवाकेंद्र सरकारठरविल इतकीजास्त रक्कम;

() कोणत्याही व्यक्तीला जबर दुखापत झाल्याच्याबाबतीत, पन्नासहजार रुपयेइतकी नियतरक्कम किंवाकेंद्र सरकारठरविल इतकीजास्त रक्कम; दिली जाणारआहे.

(कायद्याविषयीचे सर्वसामान्य ज्ञान वाचकांस व्हावे या हेतुने प्रसिद्ध केले आहे. ह्यात अनवधनाने काही चूका किंवा त्रुटी झाल्या असल्याचे लक्षात आणून दिल्यास त्या सुधारल्या जातील, याची कृपया नोंद घ्यावी.)

-सुभाष राजाराम आचरेकर, वांद्रे(पूर्व), मुंबई-५१.

: नविनतम पोस्ट्स :

 • dharmantaranधर्मांतरण, निकाह, एस. सी. व्यक्ती आणि त्याच्या धर्मांतरणासमोरील अडचणी.
  एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ‘कार्डेलिया क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात’ आर्यन खान याला अटक केल्यानंतर त्यांनी अनुसूचित (एस.सी) जातीच्या आधारे मिळवलेली सरकारी नोकरी कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विद्यमान […]
 • Keshvanand-Bharti-Caseभारतीय संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यातील ‘सत्तेचा समतोल’ साधणारा ‘केशवानंद भारती खटला’
      “केशवानंद भारती श्रीपादगलवारू आणि इतर” विरुद्ध “केरळ राज्य आणि इतर” (रिट पिटिशन (सिव्हिल)  135 ऑफ1970), ज्याला‘केशवानंद भारती निर्णय’ म्हणूनही ओळखले जाते, दि. 24 / 4 / 1973 रोजी दिलेला हा भारतीय सर्वोच्च न्यायालयाचा एक […]
 • sanvidhanराज्यघटनेचा ‘आत्मा’.
      ‘भारतीय राज्यघटना’ ( इंडियन कॉन्स्टीट्यूशन ) म्हणजे देशाचा मूलभूत व सर्वश्रेष्ठ कायदा होय. देशाची मूलभूत बैठक निश्चित करणारी, शासनाचे अधिकार आणि जनतेचे हक्क स्पष्ट्र करणारी नियमावली म्हणजे ‘राज्यघटना’ होय. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी भारतीय […]
 • Tandoori-Chai“तंदूरी चाय ” …व्हिडीओ पाहण्यासाठी पोस्टवर क्लिक करा.
  गरमा गरम… “तंदूरी चाय “.    पर्यटकांनी भेट दिलेल्या स्थानाची वा ठिकाणाची स्मृती आपल्याजवळ कायमची राहण्यास तेथील हस्तोद्योगांचे उत्पादन, खाद्य व पेय पदार्थ, कृषी उत्पादन, मृत्तिकाशिल्प, स्मारके इत्यादि कारणीभूत ठरतात. […]
 • १२ आमदारांचे नामनिर्देशन ‘कलम १६३-१’ च्या कैचित !
    भारतीय संविधानाचे कलम १७१ प्रमाणे देण्यात आलेल्या कार्यकारी अधिकारातंर्गत जिथे द्विसदनात्मक शासन आहे तिथे विधानपरिषदेवर साहित्य, कला, विज्ञान आदी क्षेत्रातील काही सदस्यांचे नामनिर्देशन करण्याचा अधिकार त्या-त्या राज्याच्या राज्यपालास असतो. […]
 • माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे ‘‘कलम ६ (३) (एक) आणि (दोन)’’ चा वापर का करावा?
  भ्रष्टाचाराला व खाबूगिरीला लगाम घालावा, पारदर्शक प्रशासन असावे आणि सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील माहिती मिळविण्याची इच्छा असणा-या नागरिकांना विवक्षित माहिती मिळावी यासाठी एक जालीम उपाय म्हणून ‘माहितीचा अधिकार अधिनियम, २००५’ हा कायदा […]
 • Lokadalat‘लोक अदालत’ ची महती !
  ऐकावं ते नवलच आहे. लोक अदालत म्हणजे काय रं भाऊ? लोक अदालत म्हणजे लोकांची अदालत. हे एक असे न्यायालय आहे जिथे तक्रारदार, वादी आणि फिर्यादी यांनी समोरासमोर बसून न्यायिक विशेषज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चर्चा करुन कायद्याला अनुरुप पण सामांजस्याने […]
Friday
December 8, 2023
Mumbai
Sunrise: 6:59 AM
Sunset: 6:00 PM
Translate »
%d