इस्लामी राजसत्ता महाराष्ट्रात स्थापित झाल्यावर मराठीने पार्सी भाषेतून अनेक शब्द स्वीकारले तसेच अरबी, तुर्की भाषांमधून पार्सीने स्वीकारलेले शब्दही मराठीत आले. उदाहरणार्थ:-
अधिकारपदे :- पेशवे, पोतनीस, चिटणीस.
युद्धसंबंधी :- चिलखत, लगाम, खंजीर, तोफ, निशाण, बंदूक इत्यादी.
पोशाखविषयक :- सदरा, कुडता, पायजमा, झगा, इत्यादी.
संगीतविषयक :- तबला, नगारा, कवाली, मैफल, गजल, जलसा, इत्यादी.
लेखनविषयक :- दौत, शाई, कागद, इत्यादी.
वास्तु / बांधकामसंदर्भात :- जमीन, गिलावा, इमारत, गच्ची, दरवाजा.
फळांविषयक :- अंगुर, खरबूज, खिसमिस,पिस्ता,बदाम.
खाद्यपदार्थ :- बिर्याणी, खिमा, फालुदायाप्रमाणेइंग्रजीतीलअनेक शब्द मराठीमध्ये आले.
अशा प्रकारे अनुकरणाची वृत्तीही माणसामध्ये उपजतअसते. यामुळे जेआपल्याला आवडते, त्याचे चटकनअनुकरण केले जाते. हे अनुकरणीय‘शब्द’, ‘वाक्य’ यांबाबतही दिसते. उदा. ‘Oh God’, ‘Excuse Me’ ‘Happy Diwali’, ‘Thank You’,यासारखे शब्द मराठीमाणूस सहजतेने वापरताना दिसतो. आपल्या अभिव्यक्तीची गरज भागविण्यासाठी जर दुस-या भाषेतीलआचारविचार, वस्तू, अन्नपदार्थअधिक समर्पक वाटतअसतील तर त्याच शब्दांचास्वीकार माणूस पटकनकरतो. उदा. ‘सायकल’, ‘पेन’, ‘शर्ट’, ‘ब्लाऊज’, ‘आईस्क्रिम’, ‘बिस्किट’, ‘बिर्याणी’ इत्यादीअसंख्य शब्द हे अभिव्यक्तीचीगरज भागविणे यासाठी स्वीकारलेजातात. अशा शब्दांचा वापर हाप्रतिष्ठितपणाचे लक्षण म्हणूनही भाषेमध्ये केला जातो. सर्वसाधरण मराठी कुटूंबातील मुलेहीआई–वडिलांचा उल्लेख‘मम्मी–डॅडी’,‘सहल’ म्हणून ‘पिकनिक’, ’शिक्षक’’ म्हणून ‘टिचर’असा उल्लेख केवळप्रतिष्ठा संपादन करणे, या हेतूने करीतअसतात. हे किती योग्य आणि अयोग्य हे ज्याचे त्यानेच ठरविलेले बरे, नाही का? कारण हे आधुनिक युग आहे.
-सुभाष राजाराम आचरेकर,वांद्रे(पूर्व), मुंबई-५१.
Add Comment