चला जाणून घेऊयात…‘ शुद्धलेखनविषयक नियम ’
शासनाच्या सर्व व्यवहारात व शिक्षणाच्या सर्व स्तरांत शुद्ध लिहिण्याबाबत शासनाचे काही नियम आहेत. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर अस्तित्वात आलेल्या साहित्य महामंडळाने शुद्धलेखनाचे चौदा नियम सांगितले आहेत. त्या नियमांना महाराष्ट्र शासनाने सप्टेंबर १९६२ मध्ये प्रथम भान्यता दिली. १९७२ च्या मार्चमध्ये या नियमांमध्ये आणखीन चार नियमांची भर घालून मूळ नियमांमधील त्रुटी दूर करून सुधारित नियम स्पष्टीकरणासह प्रसिद्ध केले गेले, हे नियम आपण आता एकएक करुन पुढीलप्रमाणे जाणून घेणार आहोत.
(३) किरकोळ नियम :-
नियम 15 : केशवसुत-पूर्वकालीन पद्य व बिष्णुशाश्त्री चिपळूूणकर – पूर्वकालीन गद्य यांतील उतारे छापताना ते मुळानुसार छापावे. तदनंतरचे लेखन (केशवसुत व चिपळूूणकर यांंच्या लेखनासह) मराठी साहित्य महामंडळाच्या प्रस्तुत लेखनविषयक नियमांस अनुसरून छापावे.
नियम 16: ‘राहणे’, ‘पाहणे’, ‘वाहणे’ अशी रूपे वापरावी. ‘रहाणे-राहाणे’, ‘पहाणे-पाहाणे’ अशी रूपे वापरू नयेत. आज्ञार्थी प्रयोग करताना ‘राहा, पाहा, वाहा’ यांजबरोबर ‘रहा, पहा, वहा’ ही रूपे वापरण्यास हरकत नाही.
नियम 17: ‘इत्यादी’ व ‘ही’ (अव्यय) हे शब्द दीर्घान्त लिहावे. ‘अन्’हा शब्द व्यंजनान्त लिहावा.
नियम 18: पद्यात वृत्ताचे बंधन पाळताना ऱ्हस्व-दीर्घाच्या बाबतीत हे नियम काटेकोरपणे पाळता येणे शक्य नसल्यास कवीला तेवढ्यापुरते स्वातंत्र्य असावे. … समाप्त.
-सुभाष राजाराम आचरेकर, वांद्रे(पूर्व), मुंबई-५१.
Add Comment