चला जाणून घेऊयात…‘ शुद्धलेखनविषयक नियम ’
शासनाच्या सर्व व्यवहारात व शिक्षणाच्या सर्व स्तरांत शुद्ध लिहिण्याबाबत शासनाचे काही नियम आहेत. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर अस्तित्वात आलेल्या साहित्य महामंडळाने शुद्धलेखनाचे चौदा नियम सांगितले आहेत. त्या नियमांना महाराष्ट्र शासनाने सप्टेंबर १९६२ मध्ये प्रथम मान्यता दिली. १९७२ च्या मार्चमध्ये या नियमांमध्ये आणखीन चार नियमांची भर घालून मूळ नियमांमधील त्रुटी दूर करून सुधारित नियम स्पष्टीकरणासह प्रसिद्ध केले गेले, हे नियम आपण आता एकएक करुन पुढीलप्रमाणे जाणून घेणार आहोत.
(१) अनुस्वार नियम :-
नियम 1 : स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा. उदाहरणार्थ, गुलकंद, विंच, तंटा, निबंध, आंबा. अनुनासिकाबद्दल विकल्पाने पर-सवर्ण लिहिण्यास हरकत नाही.
नियम 2: य् , र् , ल् , व् , श् , प् , स् , ह् यांच्यापूर्वी येणा-या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा. उदाहरणार्थ, सिंह, संयम, मांस,
नियम 3: नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरूपांवर विभक्तिप्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा उदाहरणार्थ, लोकांना, मुलांनी, तुम्हांस, लोकांसमोर, घरांपुढे.
नियम 4: वरील नियमांव्यतिरिक्त कोणत्याही कारणांसाठी व्युत्पत्तीने सिद्ध होणारे अनुस्वार देऊ नयेत. …(क्रमश: पुढील भागात).
-सुभाष राजाराम आचरेकर, वांद्रे(पूर्व), मुंबई-५१.
Add Comment