चला जाणून घेऊयात…‘ शुद्धलेखनविषयक नियम ’
शासनाच्या सर्व व्यवहारात व शिक्षणाच्या सर्व स्तरांत शुद्ध लिहिण्याबाबत शासनाचे काही नियम आहेत. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर अस्तित्वात आलेल्या साहित्य महामंडळाने शुद्धलेखनाचे चौदा नियम सांगितले आहेत. त्या नियमांना महाराष्ट्र शासनाने सप्टेंबर १९६२ मध्ये प्रथम भान्यता दिली. १९७२ च्या मार्चमध्ये या नियमांमध्ये आणखीन चार नियमांची भर घालून मूळ नियमांमधील त्रुटी दूर करून सुधारित नियम स्पष्टीकरणासह प्रसिद्ध केले गेले, हे नियम आपण आता एकएक करुन पुढीलप्रमाणे जाणून घेणार आहोत.
(३) किरकोळ नियम :-
नियम 9: ‘पूर’ हा ग्रामवाचक शब्द कोणत्याही ग्रामनामास लावताना दीर्घोपान्त्य लिहावा. उदाहरणार्थ, ‘नागपूर’, ‘संबळपूर’, ‘तारापूर’.
नियम 10: ‘कोणता’, ‘एखादा’ ही रूपे लिहावी; त्याऐवजी ‘कोणचा’, ‘एकादा’ ही रुपे लिहू नयेत.
नियम 11: ‘हळूहळू’, ‘मुळूमुळू’, ‘खुटूखुटू’ या शब्दांतील दुसरा व चौधा स्वर दीर्घ लिहावा.
नियम 12 : ए-कारान्त नामाचे सामान्यरुप या-कारान्त करावे. उदाहरणार्थ, ‘करण्यासाठी’, ‘फडक्यांना’ (म्हणजे फडके यांना); ‘पाहण्याला’, अशा रूपांऐवजी ‘करणेसाठी’, ‘फडकेंना’, ‘पाहणेला’ यांसारखी ए-कारान्त सामान्यरूपे करू नयेत.
नियम 13: लेखनात पात्राच्या किंवा वक्त्याच्या तोंडी बोलण्याची भाषा घालावी लागते. त्या वेळी तिचे स्वरूप बोलण्यातील उच्चाराप्रमाणे असावे, अन्य प्रसंगी तसे लिहू नये.
नियम 14 : ‘क्वचित्’, ‘कदाचित्’, ‘अर्थात्’, ‘अकस्मात्’, ‘विद्वान्’ इत्यादी मराठीत रूढ झालेले तत्सम शब्द अकारान्त लिहावे. … (क्रमश: पुढील भागात).
-सुभाष राजाराम आचरेकर, वांद्रे(पूर्व), मुंबई-५१.
Add Comment