–
फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे प्रकरण-११ मधील कलम १५३ च्या तरतुदीनुसार-
(1) जेव्हा केव्हा पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिका-याला अशा ठाण्याच्या हद्दीच्या आत कोणत्याही स्थळी खोटी असलेली अशी कोणतीही वजने, मापे किंवा वजन करण्याची साधने आहेत असे सकारण वाटत असेल तेव्हा, त्यास अशा स्थळी वापरात असलेली किंवा ठेवलेली वजने किंवा मापे किंवा वजन करण्याची साधने यांची तपासणी करण्यासाठी किंवा त्यांची झडती घेण्यासाठी वॉरंटशिवाय तेथे प्रवेश करता येईल.
(2) जर त्याला अशा स्थळी खोटी असलेली वजने, मापे किंवा वजन करण्यासाठी साधने आढळून आली तर, त्यास ती अभिग्रहण करता येतील, आणि अधिकारिता असलेल्या दंडाधिका-याकडे तत्काळ अशा अभिग्रहणाचे वृत्त कळवावे लागेल.
(कायद्याविषयीचे सर्वसामान्य ज्ञान वाचकांस व्हावे या हेतुने प्रसिद्ध केले आहे. ह्यात अनवधनाने काही चूका किंवा त्रुटी झाल्या असल्याचे लक्षात आणून दिल्यास त्या सुधारल्या जातील, याची कृपया नोंद घ्यावी.)
-सुभाष राजाराम आचरेकर, वांद्रे(पूर्व), मुंबई-५१.
Add Comment