फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे प्रकरण-5 मधील कलम 42 च्या तरतुदीनुसार–
(1) ज्या व्यक्तीने पोलीस अधिका-यासमक्ष बिनदखली गुन्हा केलेला असेल किंवा तो गुन्हा केल्याचा ज्या व्यक्तीवर आरोप असेल अशी कोणतीही व्यक्ती, अशा अधिका-याने मागणी केल्यावर, आपले नाव व राहण्याचे ठिकाण सांगण्यास नकार देईल किंवा सांगितलेले नाव व राहण्याचे ठिकाण हे खोटे आहे असे समजण्यास अशा अधिका-याला कारण आहे तेव्हा त्या व्यक्तीचे नाव व राहण्याचे ठिकाण यांची खात्री करता यावी म्हणून असा अधिकारी त्या व्यक्तीला अटक करु शकेल.
(2) जेव्हा अशा व्याक्तीचे खरे नाव आणि राहण्याचे ठिकाण याबाबत खात्री होईल तेव्हा, तसे फर्माविण्यात आल्यास दंडाधिका-यासमोर उपस्थित होण्यासाठी त्या व्यक्तीने जामीनदारांसहित किंवा त्यांच्याविना असे बंधपत्र निष्पादित करुन दिल्यावर त्या व्यक्तीला सोडून दिले जाईल.
परंतु, जर अशी व्यक्ती भारतातील रहिवासी नसेल तर, त्या बंधपत्राला भारतात रहिवासी असलेला किंवा असलेले जामीनदार यांचा ज़ामीन घेतला जाईल.
(3) अशा व्यक्तीचे खरे नाव व राहण्याचे ठिकाण याबाबत अटकेच्या वेळेपासून चोवीस तासांच्या आत खात्री झाली नाही अथवा बंधपत्र निष्पादित करण्यास किंवा तसे फर्माविण्यात आल्यास पुरेसे जामीनदार देण्यास ती व्यक्ती चुकली तर, अधिकारिता असलेल्या सर्वात जवळच्या दंडाधिका-यापुढे त्या व्यक्तीला तत्काळ पाठविण्यात येईल.
Add Comment