फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे प्रकरण-5 मधीलकलम 50 च्या तरतुदीनुसार-
(1) वॉरंटाशिवाय कोणत्याही इसमाला अटक करणारा प्रत्येक पोलीस अधिकारी किंवा अन्य व्यक्ती, ज्याबद्दल तिला अटक केलेली असेल, त्या अपराधाचा पूर्ण तपशील किंवा अशा अटकेची अन्य कारणे तिला, तत्काळ कळवील.
(2) जेव्हा पोलीस अधिकारी बिनजामिनी अपराधाचा आरोप असलेल्या व्यक्तीहून अन्य व्यक्तीला वॉरंटाशिवाय अटक करील तेव्हा, तो अटक केलेल्या व्यक्तीला, जामिनावर सुटका होण्यास ती हक्कदार आहे व त्या व्यक्तीला स्वत:च्या वतीने जामीनदारांची व्यवस्था करता येईल असे कळवील.
(कायद्याविषयीचे सर्वसामान्य ज्ञान वाचकांस व्हावे या हेतुने प्रसिद्ध केले आहे. ह्यात अनवधनाने काही चूका किंवा त्रुटी झाल्या असल्याचे लक्षात आणून दिल्यास त्या सुधारल्या जातील, याची कृपया नोंद घ्यावी.)
-सुभाष राजाराम आचरेकर, वांद्रे(पूर्व), मुंबई-५१.
Add Comment