फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे प्रकरण-5 मधील कलम 55-अ च्या तरतुदीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपी व्यक्तीच्या आरोग्याची व सुरक्षेची योग्य काळजी घेणे, हे त्या अरोपीचा ताबा असणा-या व्यक्तीचे कर्तव्य असेल.
तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे प्रकरण-5 मधील कलम 56च्या तरतुदीनुसार, वॉरंटशिवाय अटक करणारा पोलीस अधिकारी अनावश्यक विलंब न लावता व जामिनाबाबत यामध्ये अंतर्भूत असलेल्या उपबंधांच्या आधीनतेने, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला त्याप्रकरणी अधिकारिता असलेल्या दंडाधिका-याकडे किंवा पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिका-याकडे घेऊन जाईल किवा पाठविल.
(कायद्याविषयीचे सर्वसामान्य ज्ञान वाचकांस व्हावे या हेतुने प्रसिद्ध केले आहे. ह्यात अनवधनाने काही चूका किंवा त्रुटी झाल्या असल्याचे लक्षात आणून दिल्यास त्या सुधारल्या जातील, याची कृपया नोंद घ्यावी.)
-सुभाष राजाराम आचरेकर, वांद्रे(पूर्व), मुंबई-५१.
Add Comment