फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे प्रकरण-10 मधील कलम 129 च्या तरतुदीनुसार-
(1) कोणताही कार्यकारी दंडाधिकारी किंवा पोलीस ठाण्याचा अंमलदार अधिकारी किंवा अशा अंमलदार अधिका-च्या अनुपस्थितीत उप-निरीक्षकाहून खालच्या दर्जाचा नसलेला कोणताही पोलीस अधिकारी कोणत्याही बेकायदेशीर जमावाला किंवा जिच्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग घडून येण्याचा संभव आहे अशा पाच किंवा अधिक व्यक्तींच्या जमावाला पांगण्याचा हुकूम देऊ शकेल अणि तदनुसार पांगणे हे अशा जमावातील व्यक्तींचे तदनंतरचे कर्तव्य असेल.
(2) जर याप्रमाणे हुकूम झाला असताना असा कोणताही जमाव पांगला नाही किंवा याप्रमाणे हुकूम झाला नसताना, जेणेकरुन न पांगण्याचा निर्धार दिसून येतो त्याचे वर्तन असेल तर, उपरोक्त पोटकलम(1) मध्ये निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही कार्यकारी दंडाधिका-याला किंवा पोलीस अधिका-याला बळाने असा जमाव पांगवण्याचे काम सुरु करता येईल आणि असा जमाव पांगवण्यासाठी व जरुरतर, त्यातील घटक व्यक्तींना अशा जमावाची पांगापांग व्हावी किंवा त्यांना कायद्यानुसार शिक्षा व्हावी यासाठी अटक करुन बंदिवासात ठेवण्यासाठी सशस्त्र सेनादलाचा अधिकारी किंवा सदस्य नसलेल्या व त्या नात्याने कार्य करत नसलेल्या कोणत्याही पुरुषांचे साहाय्य अधिकारपूर्वक मागता येईल.
Add Comment