महाराष्ट्र राष्ट्रीय राज्य

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आर्थिक विकासासाठी आधुनिक आणि उत्तम दर्जाच्या रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याच्या महत्त्वावर दिला भर.

Min. Nitin Gadkari News

मुंबई, दि. १७ सप्टेंबर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशाचा आर्थिक विकास करून रोजगार संधींची निर्मिती करण्यासाठी आधुनिक आणि उच्च दर्जाच्या रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याच्या महत्त्वावर भर दिला आहे. दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी केलेल्या दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये आजच्या दुसऱ्या दिवशी ते गुजरातच्या भडोच विभागात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत होते. ते म्हणाले की द्रुतगती महामार्गामुळे केवळ दिल्ली आणि मुंबई यांच्यामधीलच नव्हे तर इतर महत्त्वाच्या शहरांदरम्यानच्या प्रवासाला लागणाऱ्या वेळात देखील कपात होणार आहे. गडकरी म्हणाले की, गुजरातमध्ये 35,100 कोटी रुपये खर्चून 423 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या निर्मितीचे काम सुरु आहे. त्यांनी सांगितले की या द्रुतगती महामार्गावर, गुजरातमध्ये 60 मोठ्या आकाराचे पूल, रस्त्यांतर्गत अदलाबदल शक्य करणारी 17 केंद्रे, 17 उड्डाणपूल आणि 8 रस्त्यांवरील पुलांचे बांधकाम होणार आहे.

केंद्रीय मंत्री म्हणाले की या द्रुतगती महामार्गावर जागतिक दर्जाच्या प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच राज्यात रोजगार संधींची निर्मिती करण्यासाठी 33 ठिकाणी मार्गालगत सुविधा केंद्रे उभारण्याचा प्रस्ताव देखील विचाराधीन आहे.

या भेटीदरम्यान ज्या ठिकाणी फेब्रुवारी 2021 मध्ये एका दिवसात सर्वात वेगाने रस्ते बांधणीचा जागतिक विक्रम करण्यात आला त्या जागेचे विक्रम गडकरी यांनी परीक्षण केले. तसेच त्यांनी भडोचजवळ नर्मदा नदीवर बांधण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण पुलाला देखील भेट देऊन पाहणी केली. 2 किलोमीटर लांबीचा एक्स्ट्रॉडॉज्ड केबल स्पॅन प्रकारचा हा पूल, द्रुतगती महामार्गावर बांधण्यात येणारा भारतातील पहिला 8 मार्गिका असलेला पूल असेल.

भडोच जवळील रस्त्यांतर्गत अदलाबदल शक्य करणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण केंद्रासह, हा प्रकल्प देशातील द्रुतगती महामार्गांच्या विकासाचा चेहरा-मोहरा बनून जाईल.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल मध्य प्रदेशात 9577 कोटी रुपये खर्चाच्या 1356 किलोमीटर लांबीच्या 34 रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन केले.

About the author

ACHUKVARTA

Add Comment

Click here to post a comment

: नविनतम पोस्ट्स :

  • dharmantaranधर्मांतरण, निकाह, एस. सी. व्यक्ती आणि त्याच्या धर्मांतरणासमोरील अडचणी.
    एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ‘कार्डेलिया क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात’ आर्यन खान याला अटक केल्यानंतर त्यांनी अनुसूचित (एस.सी) जातीच्या आधारे मिळवलेली सरकारी नोकरी कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विद्यमान […]
  • Keshvanand-Bharti-Caseभारतीय संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यातील ‘सत्तेचा समतोल’ साधणारा ‘केशवानंद भारती खटला’
        “केशवानंद भारती श्रीपादगलवारू आणि इतर” विरुद्ध “केरळ राज्य आणि इतर” (रिट पिटिशन (सिव्हिल)  135 ऑफ1970), ज्याला‘केशवानंद भारती निर्णय’ म्हणूनही ओळखले जाते, दि. 24 / 4 / 1973 रोजी दिलेला हा भारतीय सर्वोच्च न्यायालयाचा एक […]
  • sanvidhanराज्यघटनेचा ‘आत्मा’.
        ‘भारतीय राज्यघटना’ ( इंडियन कॉन्स्टीट्यूशन ) म्हणजे देशाचा मूलभूत व सर्वश्रेष्ठ कायदा होय. देशाची मूलभूत बैठक निश्चित करणारी, शासनाचे अधिकार आणि जनतेचे हक्क स्पष्ट्र करणारी नियमावली म्हणजे ‘राज्यघटना’ होय. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी भारतीय […]
  • Tandoori-Chai“तंदूरी चाय ” …व्हिडीओ पाहण्यासाठी पोस्टवर क्लिक करा.
    गरमा गरम… “तंदूरी चाय “.    पर्यटकांनी भेट दिलेल्या स्थानाची वा ठिकाणाची स्मृती आपल्याजवळ कायमची राहण्यास तेथील हस्तोद्योगांचे उत्पादन, खाद्य व पेय पदार्थ, कृषी उत्पादन, मृत्तिकाशिल्प, स्मारके इत्यादि कारणीभूत ठरतात. […]
  • १२ आमदारांचे नामनिर्देशन ‘कलम १६३-१’ च्या कैचित !
      भारतीय संविधानाचे कलम १७१ प्रमाणे देण्यात आलेल्या कार्यकारी अधिकारातंर्गत जिथे द्विसदनात्मक शासन आहे तिथे विधानपरिषदेवर साहित्य, कला, विज्ञान आदी क्षेत्रातील काही सदस्यांचे नामनिर्देशन करण्याचा अधिकार त्या-त्या राज्याच्या राज्यपालास असतो. […]
  • माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे ‘‘कलम ६ (३) (एक) आणि (दोन)’’ चा वापर का करावा?
    भ्रष्टाचाराला व खाबूगिरीला लगाम घालावा, पारदर्शक प्रशासन असावे आणि सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील माहिती मिळविण्याची इच्छा असणा-या नागरिकांना विवक्षित माहिती मिळावी यासाठी एक जालीम उपाय म्हणून ‘माहितीचा अधिकार अधिनियम, २००५’ हा कायदा […]
  • Lokadalat‘लोक अदालत’ ची महती !
    ऐकावं ते नवलच आहे. लोक अदालत म्हणजे काय रं भाऊ? लोक अदालत म्हणजे लोकांची अदालत. हे एक असे न्यायालय आहे जिथे तक्रारदार, वादी आणि फिर्यादी यांनी समोरासमोर बसून न्यायिक विशेषज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चर्चा करुन कायद्याला अनुरुप पण सामांजस्याने […]
Saturday
October 1, 2022
Mumbai
Sunrise: 6:29 AM
Sunset: 6:27 PM
Translate »
%d bloggers like this: