“चायना मॉर्निंग पोस्ट” च्या वृत्तानुसार १७ नोव्हेंबर, २०१९ रोजी ५५ वर्षे वयाचा पहिला कोविड-१९ नामक कोरोनाचा रुग्ण सापडला होता. तिथपासून आजतागायतच्या जवळपास दोन वर्षांच्या काळात कोविड-१९ नावाच्या कोरोनाने संपूर्ण जगात हाहा:कार माजवला आहे. आज घडीला या कोरोनामुळे जगातील २१.९ करोड लोक बाधित झाले असून ४५.५ लक्ष लोक मृत पावले आहेत. कोविड आजाराने मरणा-यांच्या वयाचा विचार केल्यास १७ ते ४४ वयोगटात ४.५ टक्के, ४५ ते ६४ वयोगटात २२.४ टक्के, ६५ ते ७४ वयोगटात २४.९ टक्के आणि ७५हून अधिक वयोगटात ४८.७ टक्के इतक्या लोकांचा समावेश आहे. आपल्या भारतीय लोकसेवा आयोगाच्या नियमांप्रमाणे ५८ वर्षे वय पूर्ण झालेल्या लोकांना नोकरीतून निवृत्ती दिली जाते. याचे कारण काय की ते अकार्यक्षम असावेत, निरुपयोगी असावेत आणि/किंवा त्यांच्या निवृत्तीची काय व कोणती कारणे असावीत हे त्या आयोगालाच ठाऊक. तसेही सध्याच्या संगणकीय, यंत्र व तंत्राच्या जगतात मानवी कार्मिक बळ कमी होऊन संगणकीय, यंत्र व तांत्रिक बळ कमालीचे वाढले आहे. मानवाची गरज हळूहळू कमी होऊन त्याची सगळी कामे रोबोट सारखे यंत्रमानव करु लागले आहेत. असो, ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचे तात्पर्य काय हे तुम्हाला पुढील लेख वाचल्यावर कळेल.
कोरोनाने थैमान घातलेल्या व संपूर्ण जगाला वेठीस धरलेल्या गेल्या दोन वर्षांच्या काळात राजघराणी, औषधी उद्योगसमूह व संशोधक, बँका, वित्तिय संस्था यांसारखे काही लोक गर्भ श्रीमंत झालेत, काही लोकांची परिस्थिती ही १० वर्षांपूर्वीची होऊन बसली तर काही लोकांच्या पदरी १८ विश्र्वाचे दारिद्र्य येऊन पडले. काहींच्या नोकर-या गेल्या. काहींचा पगार अर्धा झाला. काहींचे उद्योग व्यवसाय बंद झालेत. काही कर्जबाजारी झालेत. चक्रवाढ व्याज, दंड आकारुन कर्ज वसूली करणेबाबतची बँकांची लूटमारी सुरु झाली. ह्या सगळ्या गोष्टींमुळे आता महागाई प्रचंड वाढेल. काम-धंदा बंद झाल्याने, हाताला काम नसल्याने बेसुमार उपासमारी, लुट-मारी, आत्महत्या, पोलीस खटले वाढतील. त्यामुळे श्रीमंतीच्या खांद्याला खांदा लावू पाहणारा गरीब, उच्च-सुशिक्षितांच्या खांद्याला खांदा लावू पाहणारा अशिक्षित, वरिष्ठांच्या खांद्याला खांदा लावू पाहणारा कनिष्ठ यांच्या मधील दरी आणि दूरी आता गत ३० वर्षांपूर्वी होती तशीच पुन्हा होऊन बसले किंबहुना पुढील कित्येक वर्षे त्यात वाढ होतच राहील. आणि ही अशीच व ह्याच पद्धतीची जागतिक व्यवस्था असावी आणि राहावी यासाठी काही लोकांची असदृष्य यंत्रणा प्रयत्न करीत आहे की काय याबाबतच्या शंकेला वाव आहे. याचे कारण म्हणजे सन १९९२ मध्येडॉ. जॉनकोलमन ह्याइतिहासकाराने ‘कॉंस्पिरसी थिअरी’ नावाचेपुस्तक लिहूनएका नवीनजागतिक व्यवस्थेचेचित्र रंगवले आहे. त्यामध्ये त्यांनी तत्कालापर्यंतच्या जगाच्या इतिहासाचा अभ्यास करुनभविष्यात जगावरराज्य करण्याचेकसे प्रयत्नकेले जातील याचे तर्क-वितर्क नोंदवलेआहेत. ‘कमिटीऑफ ३००’ म्हणजे जगातीलजुनी राजघराणी, मोठे उद्योगसमूह, जागतिक संघटना, नामांकित संशोधनसंस्था, मोठ्याप्रकाशन संस्था, काही प्रतिथयशसंशोधक आणिविचारवंत, बँका, वित्तीय संस्था, समाजसेवीसंस्था, विविधक्षेत्रातील तज्ञ, चर्च आणि धर्मगुरुइत्यादींनी बनलेला एक गट. हागट जगामध्येएकसंघ शासनव्यवस्थाआणण्याचा प्रयत्नकरतो. असाकोलमन ह्यांच्यासिध्दांताचा मतितार्थ आहे. हा गटश्रेष्ठीजनांचा गट असून बुध्दी, शारीरिकक्षमता, वंशह्या आधारावरतो एकवरिष्ठ–श्रेष्ठअसा मानवीसमूह म्हणूनजगाला आपल्याक्षमतांच्या बळावर नियंत्रित करण्याचा प्रयत्नकरीत आहे. ह्या गटाला‘इल्युमिनाटी’असेही नाव दिलेआहे. कोलमन यांनी गेल्या शतकातील घडामोडीचाआढावा घेऊनभविष्यात जगावरअधिपत्य गाजवण्याचाकसा प्रयत्नहोणार आहेह्याचे दूरदृष्टी ठेवून बारकाईने विश्लेषण केले आहे. त्यांच्यामते ह्या श्रेष्ठीजनगटाने निर्धारित केलेली काही उद्दिष्टे आहेतती अशी, (१) जागतिक एकात्मअर्थव्यवस्था निर्माण करणे; (२) व्यक्तीच्यामनावर आणिविचारक्षमतेवर नियंत्रण प्रस्थापित करुन त्यांनायंत्रवत करणे; (३) तिस-या जगातील सुमारेतीन लाखलोक हे‘निरुपयोगी व भार’ असूनत्यांना उपासमार, साथीचे आजारकिंवा छोट्यायुध्दांद्वारे मारुन टाकणे; (४) उद्योगप्रधानव्यवस्था नष्टकरुन ‘शून्यविकास प्रधान’ समाजनिर्माण करणे. ह्यातून फक्तसंगणकीय आणिसेवाक्षेत्र वगळण्यात येतील; (५) उद्योगांच्यानष्ट होण्यानेतयार होणारेबेरोजगार हेमादक द्रव्यांचेआहारी जातीलआणि नष्टहोतील; (६) काही अत्यावश्यकवैज्ञानिक संशोधना व्यतिरिक्त अन्य सर्वसंशोधन बंदकरणे; (७) मादक पदार्थआणि नग्नचित्रेकायदेशीर करणे; (८) मोठ्याशहरांतून लोकसंख्याकमी करणे/ हटवणे; (९) कामागारवर्गाचे मनोबल खच्चीकरणे आणिअन्य जनतेचेनैतिक खच्चीकरणकरणे. त्याद्वारेत्यांना व्यसनाधिन करणे; (१०) छोट्या–छोट्यासंघर्षातून जनतेमध्ये अनेक समस्या वसंभ्रम निर्माणकरणे. त्यातूनत्यांची व्यसनाधीनताआणि व्यवस्थेबद्दलउदासिनता वाढवणे; (११) रॉकसंगीत, विविधमनोरंजनात्मक संघटनाद्वारे जनतेला गुंतवून ठेवणे; (१२) राष्ट्रीयत्वाच्याखुणा आणिराष्ट्रीय स्वाभिमानाची चिन्हे नष्ट करणे; (१३) चर्चनियंत्रणाखाली आणून त्याचा प्रभाव नष्टकरणे; (१४) ख्रिश्चन धर्माच्याकट्टरपंथाला प्रोत्साहन देणे व त्यासाठीभरपूर पैसापुरवणे. तसेचअन्य धर्मातीलकट्टर विचारांनाप्रोत्साहित करणे; (१५) जागतिक अर्थव्यवस्थादुबळी करणेआणि राजकीयअस्थिरता वअराजकता वाढवणे; (१६) देशांच्यासार्वभौमत्वाला आणि एकात्मतेला पोखरुन नष्टकरणे; आणि (१७) जगभर दहशतवादीकृत्यांना प्रोत्साहन देणे.
वरील उद्दिष्टे हीसध्याच्या जागतिक व्यवस्थेशी जितकी अनुरुप व समर्पक वाटतात तशी ती विघातकच आहेत. ही उद्दिष्टे विघातक असलीतरी जागतिकशासन व्यवस्थाप्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रे वअन्य सर्वजागतिक संस्थांनासहकार्य करण्याचेआवाहन ह्यामध्येकेले आहे. परंतु एकूणहा सिध्दांतएक प्रकारचा‘कट’असून त्याचाआधार भयगंड, संभ्रम, द्वेष, संघर्ष इत्यादीआहे. हीसर्व कृत्येजाणीवपूर्वक प्रचारातून नियंत्रित केली जातात. जगामध्ये घडलेल्याअनेक कृत्यांतून, संघर्षातून, गुप्तहेर संघटना व संशोधनसंस्थांच्या कार्यातून भविष्यातील तथाकथित कटाच्याह्या सिध्दांताचीमांडणी करण्यातआली आहे. परंतु खूपच भडक, अतिरंजित आणि विघातक असा हा सिध्दांतवाटतो. संयुक्तराष्ट्र संघालाअधिक सशक्तकरुन सामोपचाराने, समन्वयाने जागतिक शासन निर्माण होऊशकते. पणत्याकरता उपरोक्तअघोरी मार्गांपेक्षाअधिक सकारात्मक, विधायक मार्गस्वीकारायला हवा अन्यथा हे असेच सुरु राहिले तर मानवच मानवाच्या विनाशाला कारक ठरेल.
-सुभाष राजाराम आचरेकर, वांद्रे(पूर्व), मुंबई-५१.
Add Comment