अनुराग ठाकूर यांनी 2010 चा नरेंद्र मोदी आणि भाविना पटेल यांचा एक अविस्मरणीय फोटो केला शेअर
नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2021 : टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये महिलांच्या एकेरी टेबल टेनिस प्रकारामध्ये भारताला पहिले रौप्य पदक मिळवून देऊन भाविना पटेलने इतिहास रचला आहे. राष्ट्रीय क्रीडा दिन 2021 च्या निमित्ताने रौप्य पदक जिंकणे ही एक आनंदाची आणि देशासाठीची अविस्मरणीय भेट आहे.
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी इतिहासाची आठवण करून देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाविना सोबत शेअर केलेल्या काही क्षणांचे स्मरण करून दिले. त्यांनी 2010 मधील एक फोटो शेअर केला होता, ज्यात भाविना आणि तिची सहकारी सोनलबेन पटेल यांचा गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सत्कार केला होता. त्यावेळी सोनल आणि भावना 2010 मध्ये दिल्लीत आयोजित केलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी रवाना होत होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची त्यांनी भेट घेतली होती आणि त्यांना मोदी यांनी सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करण्यासाठी प्रोत्साहित केले होते असे, अनुराग ठाकूर यांनी ट्वीटर संदेशात लिहिले आहे.
34 वर्षीय खेळाडू भारतीय पॅरा-टेबल टेनिस या खेळातील चौथ्या श्रेणीत जागतिक क्रमवारीत 12 व्या स्थानी आहे. तिच्या नावावर चार पॅरालिम्पिक खेळांमधून एकूण सहा सुवर्णपदके आहेत.
Add Comment