अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून हरदिन नवे रूप. बहु भुजानी ओढला तिने असुरांवर चाप.
प्रथम देवी”शैलपुत्री” हिमालयाची दुहिता. गाईवर आरूढ आहे त्रिशूळधारी माता.
हाती जपमाळ, कमंडलू स्वपायावर स्वार. “ब्रम्हचारिणी” तापस्वि बंद मोह,माया द्वार.
कल्याणकारी देवी”चंद्रघंटा” सिंहावर स्वार. त्रिशुळ,डमरू,कमळ,कमंडलू दश बाहुवर भार.
अष्टभुजा,सुर्यप्रभा तेजकांती,मंद-स्मित वदन. ज्ञान,शहाणपण देवी”कुष्मांडा” सिंह वाहन.
तारणहारी,इच्छा पूर्ती देवी कार्तिकेची माता. सिंह वाहन,कमळ आसन देवी”स्कंदमाता”.
अर्थ,धर्म,काम,मोक्ष प्राप्ती “कातीयांनी” उपासने. कमळ,तलवार अस्त्र बाहुत रूढ सिंह वाहने.
कृष्णवर्ण,विस्कटले केस,भूत-पिशाच्चहुन मुक्ती. कंठी दामिनी माळ,त्रिनेत्री, लोह-कोयता हाती.
रूप भयावह देवी “काळरात्री” वाहन गाढव. श्वासश्वासातून तिच्या उसळे अग्नीचे तांडव.
“महागौरी”बैलावर रूढ त्रिशूल-डमरू हाती. प्रेमळ,करुण रूप. घोर तप शिव जिंकण्यासाठी.
देवी”सिद्धीदात्री”कमळावर बसली षष्ठ करी. श्रमजीवी,सिद्धीदायिनी शिवअर्धनारेश्वरी.
नावदुर्गेची नवरूपे नित्यदिन माळ, सोहोळापूजा,होम,गरबा,आरती,ओटी झेंडुच्या माळा.
-कल्पना देवळेकर म्हापुसकर, ठाणे
Add Comment