आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय राज्य

अवैध कृत्ये (प्रतिबंध) कायदा 1967अंतर्गत आणखी अठरा व्यक्ती दहशतवादी म्हणून घोषित

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम आणि कणखर नेतृत्वाखाली केंद्र सरकारने एखाद्या  व्यक्तीला दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या तरतूदीचा समावेश करण्यासाठी ऑगस्ट 2019 मध्ये अवैध कृत्ये (प्रतिबंध) कायदा 1967 मध्ये दुरुस्ती केली होती. या दुरुस्तीपूर्वी केवळ संघटनांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले जात होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दहशतवादाविरुद्ध लढा देण्याच्या देशाच्या दृढ निश्चयाची पुनरुच्चार केला आहे. या सुधारित तरतुदीनुसार  केंद्र सरकारने सप्टेंबर, 2019 मध्ये चार आणि जुलै 2020 मध्ये नऊ जणांना दहशतवादी म्हणून घोषित केले.

राष्ट्रीय सुरक्षा बळकट करण्याच्या  आणि दहशतवाद अजिबात खपवून न घेण्याच्या धोरणाप्रति  वचनबद्धता अधिक मजबूत करत मोदी सरकारने आज पुढील अठरा व्यक्तींना युएपीए कायदा 1967 च्या (2019 मध्ये सुधारित) तरतुदीनुसार दहशतवादी म्हणून घोषित केले आणि  त्यांची नावे या कायद्या सूचीत समाविष्ट केली . त्यांची माहिती खालीलप्रमाणे आहेः

1.साजिद मीर @ साजिद मजीद @ इब्राहिम शाह @ वसी @ खली @ मुहम्मद वसीमपाकिस्तान स्थित वरिष्ठ एलईटी कमांडर आणि 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याची योजना आखणाऱ्यांपैकी एक होता.
2.युसुफ मुझम्मिल @ अहमद भाई @ युसूफ मुझम्मिल बट @ हुरेरा भाईजम्मू-काश्मीरमधील एलईटी कारवायांचा पाकिस्तान स्थित कमांडर आणि 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी.
3.अब्दुर रहमान मक्की @ अब्दुल रहमान मक्की  हाफिज सईद याचा मेव्हणा , एलईटीचा प्रमुख आणि एलईटी राजकीय प्रकरणांचा प्रमुख आणि एलईटीचा परराष्ट्र संबंध विभाग प्रमुख .होता
4.शाहिद मेहमूद @ शाहिद मेहमूद रेहमतुल्लापाकिस्तान स्थित लष्कर-ए-तैयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेच्या फलाह-ए-लन्झनियात फाउंडेशन (एफआयएफ). या अग्रणी संघटनेचा उपप्रमुख  
5.फरहतुल्लाह घोरी @ अबू सुफियान @ सरदार साहब @ फारूपाकिस्तान स्थित दहशतवादी आणि अक्षरधाम मंदिर (2002) हल्ला आणि हैदराबादमधील टास्क फोर्स कार्यालयावर आत्मघाती हल्ला (2005).यात सहभाग
6.अब्दुल रौफ असगर @ मुफ्ती @ मुफ्ती असगर @ साद बाबा @ मौलाना मुफ्ती रौफ असगरनवी दिल्लीतील भारतीय संसद भवनवरील दहशतवादी हल्ल्याचे (13.12.2001) षडयंत्र रचण्यात आणि लष्करी प्रशिक्षण आणि पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण शिबिरांची उभारणी करण्यात सहभागी पाकिस्तान स्थित दहशतवादी.
7.इब्राहिम अथार @ अहमद अलीमोहद. अली शेख @ जावेदअमजाद सिद्दीकी @ ए.ए. शेख @ चीफ24 डिसेंबर 1999 रोजी इंडियन एअरलाइन्सचे विमान क्रमांक एलसी -814 च्या अपहरणात कंदहार अपहरण प्रकरण) सामील असलेला पाकिस्तान स्थित दहशतवादी आणि भारतीय संसदेवरील दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार (13.12.2001).
8.युसूफ अझहर @ अझर यूसुफ @ मोहम्मद. सलीम24 डिसेंबर 1999 रोजी इंडियन एअरलाइन्सचे उड्डाण क्रमांक एलसी -814 च्या अपहरणात (कंदहार अपहरण प्रकरण) सामील असलेला पाकिस्तान स्थित दहशतवादी
9.शाहिद लतीफ @ छोटा शाहिद भाई @ नूर अल दिनपाकिस्तानमधील दहशतवादी आणि सियालकोट क्षेत्राचा जैश-ए -मोहम्मदाचा कमांडर , जेईएम दहशतवाद्यांना भारतात आणण्यात सहभाग . भारतातील दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन, सेवा पुरवणे, आणि अंमलबजावणीमध्ये देखील सहभागी होता
10.सय्यद मोहम्मद युसुफ शहा @ सय्यदसलाहुदीन @ पीर साहब @ बुजर्गपाकिस्तान आधारित, हिज्ब-उल-मुजाहिद्दीनचा सर्वोच्च कमांडर आणि युनायटेड जिहाद काउन्सिलचा अध्यक्ष (यूजेसी) एचएम कॅडरद्वारे दहशतवादी कारवायांना चालना देण्यासाठी भारतात निधी उभारणी आणि वित्तपुरवठा करण्यात सहभागी
11.गुलाम नबी खान @ अमीर खान @ सैफुल्ला खालिद @ खालिद सैफुल्ला @ जवाद @ दांडपाकिस्तान स्थित हिजबुल मुजाहिद्दीनचा उप-प्रमुख (एचएम).
12.झाफर हुसेन भट @ खुर्शीद @ मोहम्मद. जफर खान @ मौलवी @ खुर्शीद इब्राहिमपाकिस्तान स्थित हिजबुल मुजाहिद्दीन चा उपप्रमुख, आणि हिज्बुल मुजाहिद्दीनचे आर्थिक व्यवहारही सांभाळतो . काश्मीर खोऱ्यात एचएम कारवायांसाठी निधी पाठविण्यास जबाबदार.
13.रियाझ इस्माईल शाहबंदरी @ शाह रियाझ अहमद @ रियाज भटकळ @ मोह . रियाझ @ अहमद भाई @ रसूल खान @ रोशन खान @ अझीझपाकिस्तान स्थित , “इंडियन मुजाहिद्दीन” या दहशतवादी संघटनेचा संस्थापक सदस्य. जर्मन बेकरी (2010), चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू (2010), जामा मशिद (2010), शीतलाघाट (2010) आणि मुंबई (2011) सह भारतातील विविध दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी आहे.
14.मोह . इकबाल @ शबंद्री मोहम्मद इक्बाल @ इकबाल भटकळपाकिस्तान स्थित , इंडियन मुजाहिद्दीन (आयएम). दहशतवादी संघटनेचा सह-संस्थापक, जयपुर बॉम्बस्फोट मालिका (2008), दिल्ली बॉम्बस्फोट मालिका (2008), अहमदाबाद आणि सुरत बॉम्बस्फोट (2008) जर्मन बेकरी ब्लास्ट, पुणे (2010) आणि चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगलुरू स्फोट (2010) यासह दहशतवादी वित्तपुरवठा आणि विविध दहशतवादी कारवायांमध्ये सामील आहे. )
15.शेख शकील @ छोटा शकीलदाऊद इब्राहिमचे पाकिस्तान स्थित सहकारी, डी-कंपनीच्या सर्व गुन्हेगारी आणि अंडरवर्ल्ड कारवाया पाहतो. डी-कंपनीच्या भारतातील कारवायांना वित्तपुरवठा , 1993 मध्ये गुजरात मध्ये शस्त्रास्त्र तस्करीमध्ये सामील होता.
16.मोहम्मद अनीस शेखमुंबई बॉम्बस्फोट प्रकरण 1993 मध्ये सहभाग आणि शस्त्रे, दारुगोळा आणि हॅण्डग्रेनेडच्या पुरवठ्यास जबाबदार पाकिस्तानस्थित दहशतवादी.
17.इब्राहिम मेमन @ टायगर मेमन @ मुश्ताक @ सिकंदर @ इब्राहिम अब्दुल रझाक मेमन @ मुस्तफा @ इस्माईलमुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात गुन्हेगारी कट रचणारा पाकिस्तान स्थित दहशतवादी.
18.जावेद चिकना @ जावेद दाऊद टेलर1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात सामील असलेला पाकिस्तान स्थित दाऊद इब्राहिम कासकरचा हस्तक.

सीमेपलिकडून विविध दहशतवादी कारवायांमध्ये हे सामील होते. आणि  देशाला अस्थिर करण्याचे त्यांचे प्रयत्न अथक सुरु होते.

About the author

ACHUKVARTA

Add Comment

Click here to post a comment

: नविनतम पोस्ट्स :

  • dharmantaranधर्मांतरण, निकाह, एस. सी. व्यक्ती आणि त्याच्या धर्मांतरणासमोरील अडचणी.
    एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ‘कार्डेलिया क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात’ आर्यन खान याला अटक केल्यानंतर त्यांनी अनुसूचित (एस.सी) जातीच्या आधारे मिळवलेली सरकारी नोकरी कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विद्यमान […]
  • Keshvanand-Bharti-Caseभारतीय संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यातील ‘सत्तेचा समतोल’ साधणारा ‘केशवानंद भारती खटला’
        “केशवानंद भारती श्रीपादगलवारू आणि इतर” विरुद्ध “केरळ राज्य आणि इतर” (रिट पिटिशन (सिव्हिल)  135 ऑफ1970), ज्याला‘केशवानंद भारती निर्णय’ म्हणूनही ओळखले जाते, दि. 24 / 4 / 1973 रोजी दिलेला हा भारतीय सर्वोच्च न्यायालयाचा एक […]
  • sanvidhanराज्यघटनेचा ‘आत्मा’.
        ‘भारतीय राज्यघटना’ ( इंडियन कॉन्स्टीट्यूशन ) म्हणजे देशाचा मूलभूत व सर्वश्रेष्ठ कायदा होय. देशाची मूलभूत बैठक निश्चित करणारी, शासनाचे अधिकार आणि जनतेचे हक्क स्पष्ट्र करणारी नियमावली म्हणजे ‘राज्यघटना’ होय. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी भारतीय […]
  • Tandoori-Chai“तंदूरी चाय ” …व्हिडीओ पाहण्यासाठी पोस्टवर क्लिक करा.
    गरमा गरम… “तंदूरी चाय “.    पर्यटकांनी भेट दिलेल्या स्थानाची वा ठिकाणाची स्मृती आपल्याजवळ कायमची राहण्यास तेथील हस्तोद्योगांचे उत्पादन, खाद्य व पेय पदार्थ, कृषी उत्पादन, मृत्तिकाशिल्प, स्मारके इत्यादि कारणीभूत ठरतात. […]
  • १२ आमदारांचे नामनिर्देशन ‘कलम १६३-१’ च्या कैचित !
      भारतीय संविधानाचे कलम १७१ प्रमाणे देण्यात आलेल्या कार्यकारी अधिकारातंर्गत जिथे द्विसदनात्मक शासन आहे तिथे विधानपरिषदेवर साहित्य, कला, विज्ञान आदी क्षेत्रातील काही सदस्यांचे नामनिर्देशन करण्याचा अधिकार त्या-त्या राज्याच्या राज्यपालास असतो. […]
  • माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे ‘‘कलम ६ (३) (एक) आणि (दोन)’’ चा वापर का करावा?
    भ्रष्टाचाराला व खाबूगिरीला लगाम घालावा, पारदर्शक प्रशासन असावे आणि सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील माहिती मिळविण्याची इच्छा असणा-या नागरिकांना विवक्षित माहिती मिळावी यासाठी एक जालीम उपाय म्हणून ‘माहितीचा अधिकार अधिनियम, २००५’ हा कायदा […]
  • Lokadalat‘लोक अदालत’ ची महती !
    ऐकावं ते नवलच आहे. लोक अदालत म्हणजे काय रं भाऊ? लोक अदालत म्हणजे लोकांची अदालत. हे एक असे न्यायालय आहे जिथे तक्रारदार, वादी आणि फिर्यादी यांनी समोरासमोर बसून न्यायिक विशेषज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चर्चा करुन कायद्याला अनुरुप पण सामांजस्याने […]
Friday
June 2, 2023
Mumbai
Sunrise: 6:00 AM
Sunset: 7:12 PM
Translate »
%d bloggers like this: