महाराष्ट्र राष्ट्रीय राज्य व्यवसाय

राज्यपाल, रामदेव बाबा यांच्या उपस्थितीत संस्कृत विद्यापीठाचा पदवीदान समारोह संपन्न

Sanskrit image

‘संस्कृत भाषा गंगेप्रमाणे निरंतर आहे’: राज्यपाल

मुंबई, 8 सप्टेंबर : लॅटिन व रोमन भाषा इतिहासजमा होत आहेत, परंतु संस्कृत भाषा गंगेप्रमाणे निरंतर आहे. अनेकदा लहान मोठ्या नद्या काही काळ लुप्त होतात आणि पुन्हा पुनरुज्जीवित होतात, त्याप्रमाणे संस्कृत भाषा लुप्त होत आहे असे वाटत असले तरीही ती सदा जागृत भाषा आहे. संस्कृत ज्ञानभाषा असून तिला राष्ट्रभाषा म्हणून प्रतिष्ठापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज केले.

          रामटेक येथील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचा ९ वा पदवीदान समारंभ राज्यपाल कोश्यारी तसेच पतंजली योगपीठाचे प्रमुख बाबा रामदेव यांच्या आभासी उपस्थितीत संपन्न झाला त्यावेळी राज्यपाल बोलत होते. 

          संस्कृत हृदयस्पर्शी भाषा असून ज्ञानाचा अथांग सागर आहे. गीता, उपनिषदे त्यातील मोती आहेत. संस्कृतमधील सुभाषिते अर्थपूर्ण आहेत. संस्कृत भाषेतील ज्ञान प्रकाशात आणून त्याचा प्रचार प्रसार कसा होईल याचा समग्र विचार झाला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

अभियांत्रिकी, वैद्यकीय शाखेतील शिक्षण संस्कृत मधून द्यावे : बाबा रामदेव

          संस्कृत केवळ भाषा नसून ती एक संस्कृती आहे. भाषा, साहित्य, वेदविद्या, दर्शनादि विविध शास्त्रे संस्कृतमधून आहे. परा – अपरा विद्या, प्रवृत्ती – निवृत्ती, प्रेयस् – श्रेयस् या सर्वांचे सार संस्कृत भाषा आहे. अभियांत्रिकी, चिकित्साशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र इ. विविध तंत्र विषयांचे शिक्षण संस्कृतमधून झाले पाहिजे, असे यावेळी बोलताना बाबा रामदेव यांनी सांगितले.

          नवीन शैक्षणिक धोरणात पहिली ते बारावी संस्कृत शिक्षण अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक संस्कृत शिक्षकांची गरज संस्कृत विद्यापीठाने पूर्ण करावी, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

          संस्कृत विद्यापीठाने महाकवी कालिदास यांचे समग्र साहित्य मराठी भाषेत भाषांतरित केले असल्याचे सांगून विद्यापीठ सर्व बाबतीत स्वयंपूर्ण होत असल्याचे कुलगुरु डॉ. श्रीनिवास वरखेडी यांनी सांगितले.

          यावेळी संस्कृत विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरु डॉ. पंकज चांदे तसेच कैवल्यधाम योग संस्थेचे सचिव ओमप्रकाश तिवारी यांना मानद विद्या वाचस्पती ही पदवी प्रदान करण्यात आली तसेच निवडक स्नातकांना पीएच डी व सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.

: नविनतम पोस्ट्स :

  • dharmantaranधर्मांतरण, निकाह, एस. सी. व्यक्ती आणि त्याच्या धर्मांतरणासमोरील अडचणी.
    एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ‘कार्डेलिया क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात’ आर्यन खान याला अटक केल्यानंतर त्यांनी अनुसूचित (एस.सी) जातीच्या आधारे मिळवलेली सरकारी नोकरी कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विद्यमान […]
  • Keshvanand-Bharti-Caseभारतीय संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यातील ‘सत्तेचा समतोल’ साधणारा ‘केशवानंद भारती खटला’
        “केशवानंद भारती श्रीपादगलवारू आणि इतर” विरुद्ध “केरळ राज्य आणि इतर” (रिट पिटिशन (सिव्हिल)  135 ऑफ1970), ज्याला‘केशवानंद भारती निर्णय’ म्हणूनही ओळखले जाते, दि. 24 / 4 / 1973 रोजी दिलेला हा भारतीय सर्वोच्च न्यायालयाचा एक […]
  • sanvidhanराज्यघटनेचा ‘आत्मा’.
        ‘भारतीय राज्यघटना’ ( इंडियन कॉन्स्टीट्यूशन ) म्हणजे देशाचा मूलभूत व सर्वश्रेष्ठ कायदा होय. देशाची मूलभूत बैठक निश्चित करणारी, शासनाचे अधिकार आणि जनतेचे हक्क स्पष्ट्र करणारी नियमावली म्हणजे ‘राज्यघटना’ होय. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी भारतीय […]
  • Tandoori-Chai“तंदूरी चाय ” …व्हिडीओ पाहण्यासाठी पोस्टवर क्लिक करा.
    गरमा गरम… “तंदूरी चाय “.    पर्यटकांनी भेट दिलेल्या स्थानाची वा ठिकाणाची स्मृती आपल्याजवळ कायमची राहण्यास तेथील हस्तोद्योगांचे उत्पादन, खाद्य व पेय पदार्थ, कृषी उत्पादन, मृत्तिकाशिल्प, स्मारके इत्यादि कारणीभूत ठरतात. […]
  • १२ आमदारांचे नामनिर्देशन ‘कलम १६३-१’ च्या कैचित !
      भारतीय संविधानाचे कलम १७१ प्रमाणे देण्यात आलेल्या कार्यकारी अधिकारातंर्गत जिथे द्विसदनात्मक शासन आहे तिथे विधानपरिषदेवर साहित्य, कला, विज्ञान आदी क्षेत्रातील काही सदस्यांचे नामनिर्देशन करण्याचा अधिकार त्या-त्या राज्याच्या राज्यपालास असतो. […]
  • माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे ‘‘कलम ६ (३) (एक) आणि (दोन)’’ चा वापर का करावा?
    भ्रष्टाचाराला व खाबूगिरीला लगाम घालावा, पारदर्शक प्रशासन असावे आणि सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील माहिती मिळविण्याची इच्छा असणा-या नागरिकांना विवक्षित माहिती मिळावी यासाठी एक जालीम उपाय म्हणून ‘माहितीचा अधिकार अधिनियम, २००५’ हा कायदा […]
  • Lokadalat‘लोक अदालत’ ची महती !
    ऐकावं ते नवलच आहे. लोक अदालत म्हणजे काय रं भाऊ? लोक अदालत म्हणजे लोकांची अदालत. हे एक असे न्यायालय आहे जिथे तक्रारदार, वादी आणि फिर्यादी यांनी समोरासमोर बसून न्यायिक विशेषज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चर्चा करुन कायद्याला अनुरुप पण सामांजस्याने […]
Friday
June 2, 2023
Mumbai
Sunrise: 6:00 AM
Sunset: 7:12 PM
Translate »
%d bloggers like this: