नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान म्हणाले, “भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल भारत शोक व्यक्त करत आहे. त्यांनी आपल्या राष्ट्राच्या विकासाच्या मार्गावर एक अमिट छाप सोडली आहे. ते एक उच्च दर्जाचा विद्वान , एक उत्कृष्ट राजकारणी होते आणि राजकीय क्षेत्रात तसेच समाजातील सर्व घटकांसाठी ते आदरणीय होते.
अनेक दशकांच्या राजकीय कारकीर्दीत प्रणव मुखर्जी यांनी आर्थिक आणि धोरणात्मक दृष्ट्या महत्त्वाच्या मंत्रालयांमध्ये दीर्घकाळ योगदान दिले. ते एक उत्कृष्ट संसदपटू होते, त्यांची अभ्यासपूर्ण तयारी असायची, ते उत्कृष्ट वक्ते होते आणि त्यांना विनोदाचे उत्तम अंग होते.
भारताचे राष्ट्रपती म्हणून प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती भवन सामान्य नागरिकांना अधिक खुले करून दिले. त्यांनी राष्ट्रपती भवन शिक्षण, संशोधन , संस्कृती, विज्ञान आणि साहित्य यांचे केंद्र बनविले. प्रमुख धोरणात्मक बाबींविषयी त्यांचे सुज्ञ मार्गदर्शन मी कधीही विसरणार नाही.
2014 मध्ये मी दिल्लीत नवीन होतो. पहिल्या दिवसापासूनच मला प्रणव मुखर्जी यांचे मार्गदर्शन, पाठिंबा आणि आशीर्वाद मिळाला. त्यांच्याबरोबर माझा संवाद माझ्यासाठी नेहमीच आनंददायी होता. त्यांचे कुटुंब, मित्र, प्रशंसक आणि देशभरातील समर्थकांच्या दुःखात मी सहभागी आहे. ओम शांती.
Add Comment