सातारा, २२ सप्टेंबर : ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.अभिनेत्री आशालता यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती त्यांना तातडीने सातारा येथील प्रतिभा इस्पितळात भरती करण्यात आले होते.
काळूबाईच्या नावाने चांगभलं या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना करोनाची लागण झाली होती. केवळ आशालता यांनाच नाही तर काळूबाईच्या सेटवर काम करणाऱ्या २७ जणांना करोनाची लागण झाली होती. अचानक त्यांची प्रकृती खालावली गेली. त्यामुळे त्यांना इस्पितळात भरती करण्यात आले. प्रकृती चिंताजनक आल्याने त्याना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. अखेर आज पहाटे ४.४५ वाजताच्या सुमारास त्यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी दुःख निधन झाल्याने चित्रपट श्रुष्टीवर शोककळा पसरली आहे.
आशालता यांनी १००हून अधिक हिंदी व मराठी सिनेमांत अभिनय केला आहे. सुपर हिट हिंदी सिनेमा ‘जंजिर’ यात आशालता यांनी अमिताभच्या ‘आई’ ची भूमिका केली होती. आशालता यांना बेस्ट सपोर्टिंक कलाकार साठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
Add Comment