मनोरंजन राष्ट्रीय राज्य

केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाद्वारे आयोजित केला जाणारा “हुनर हाट” ऑक्टोबरपासून पुन्हा सुरु होणार

hunar hat image

“हुनर हाट” ने गेल्या 5 वर्षात 5 लाखाहून अधिक भारतीय कारागीर, हस्तकलाकार, पाककला तज्ज्ञ आणि त्यांच्याशी संबंधित इतर लोकांना रोजगार आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. ”- मुख्तार अब्बास नक्वी

नवी दिल्ली, ८ सप्टेंबर : कोरोना महामारीमुळे सुमारे 6 महिन्यांच्या कालावधीनंतर 9 ऑक्टोबर, 2020 पासून “लोकल ते ग्लोबल” या संकल्पनेतून “हुनर हाट” पुन्हा सुरू होईल आणि स्वदेशी आकर्षक भारतीय खेळण्यांवर लक्ष केंद्रित करेल.

देशाच्या प्रत्येक कानाकोप-यात स्थानिक खेळण्यांचा पारंपरिक व वडिलोपार्जित वारसा आहे असे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “स्वदेशी खेळण्याच्या” वापराच्या आवाहनानंतर नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या स्वदेशी खेळणी उद्योगाला नवचैतन्य प्राप्त झाले आहे. कूड, पितळ, बांबू, काच, कपडा, कागद, चिकणमाती इत्यादींनी बनवलेल्या देशी खेळण्यांच्या विविधतेने देशाचा प्रत्येक कोपरा समृद्ध आहे असे गौरवोद्गार नक्वी यांनी काढले. स्वदेशी उत्कृष्ठ खेळणी तयार करणाऱ्या कुशल कारागीरांना बाजारपेठ आणि संधी उपलब्ध करून देणारे  “हुनर हाट” हे एक अतिशय उत्तम व्यासपीठ असेल.

नक्वी म्हणाले की, “स्थानिक खेळण्यांना प्रोत्साहन देण्याच्या आवाहनानंतर” भारतीय खेळणी उद्योग पुन्हा खेळण्यांच्या बाजारामध्ये आपले वर्चस्व स्थापित करेल. ते म्हणाले की, 9 ऑक्टोबर, 2020 पासून “लोकल ते ग्लोबल” या संकल्पनेसह “हुनर हाट” पुन्हा आयोजित केले जाईल. यानंतरचा “हुनर हाट” प्रयागराज येथे 9 ते 18 ऑक्टोबर, 2020 दरम्यान आयोजित केला जाईल. देशी खेळणी तयार करणा-या कारागिरांसाठी 30 टक्क्यांहून अधिक स्टॉल्स असतील. त्यांना स्वदेशी खेळण्यांच्या आकर्षक वेष्टनासाठी विविध संस्थांकडून मदत दिली जाईल.” गेल्या 5 वर्षात 5 लाखाहून अधिक भारतीय कारागीर, हस्तकलाकार, पाककला तज्ज्ञ आणि त्यांच्याशी संबंधित इतर लोकांना रोजगार आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे “हुनर हाट” लोकप्रिय झाले आहे असे नक्वी यांनी सांगितले. देशातील दुर्गम भागातील कारागीर व शिल्पकारांना बाजारपेठ आणि संधी उपलब्ध करून देणारे “हुनर हाट” दुर्मिळ स्वदेशी हस्तकला उत्पादनांचा विश्वासार्ह ब्रँड बनले आहे.

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने आत्तापर्यंत देशभरात दोन डझनहून अधिक “हुनर हाट” आयोजित केले आहेत जिथे लाखों कारागीर, शिल्पकार यांना या “हुनर हाट” च्या माध्यमातून रोजगार आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. आगामी काळात जयपुर (23 ऑक्टोबर -1 नोव्हेंबर 2020), चंदीगड (7- 15 नोव्हेंबर 2020), इंदूर (21 ते 29 नोव्हेंबर 2020), मुंबई (22 ते 31 डिसेंबर 2020) येथे “हुनार हाट” आयोजित केले जाईल. हैदराबाद (8 ते 17 जानेवारी 2021), लखनऊ (23 ते 31 जानेवारी 2021), इंडिया गेट, नवी दिल्ली (13 ते 21 फेब्रुवारी 2021), रांची (20 ते 28 फेब्रुवारी 2021), कोटा (5 ते 14 मार्च 2021), सूरत / अहमदाबाद (20 ते 27 मार्च 2021) इत्यादी ठिकाणी “हुनर हाट” चे आयोजन करण्यात येईल.

यावेळी लोक “हुनर हाट” उत्पादने डिजिटल व ऑनलाईन पद्धतीने खरेदी करू शकतील असे नक्वी यांनी सांगितले.  केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालय या कारागीर आणि त्यांच्या देशी उत्पादनांची नोंदणी “जेएम” (गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस) वर करीत आहे. या कारागीरांनी तयार केलेल्या स्वदेशी उत्पादनांसाठी अनेक निर्यात प्रोत्साहन समित्यांनी मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय बाजारपेठा उपलब्ध करुन देण्यास रस दर्शविला आहे. “हुनर हाट” पुन्हा आयोजित करण्यात येणार असल्यामुळे देशभरातील लाखो कुशल कारागीर आणि शिल्पकारांमध्ये आनंद आणि उत्साह दिसत आहे असे नक्वी म्हणाले.

: नविनतम पोस्ट्स :

 • dharmantaranधर्मांतरण, निकाह, एस. सी. व्यक्ती आणि त्याच्या धर्मांतरणासमोरील अडचणी.
  एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ‘कार्डेलिया क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात’ आर्यन खान याला अटक केल्यानंतर त्यांनी अनुसूचित (एस.सी) जातीच्या आधारे मिळवलेली सरकारी नोकरी कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विद्यमान […]
 • Keshvanand-Bharti-Caseभारतीय संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यातील ‘सत्तेचा समतोल’ साधणारा ‘केशवानंद भारती खटला’
      “केशवानंद भारती श्रीपादगलवारू आणि इतर” विरुद्ध “केरळ राज्य आणि इतर” (रिट पिटिशन (सिव्हिल)  135 ऑफ1970), ज्याला‘केशवानंद भारती निर्णय’ म्हणूनही ओळखले जाते, दि. 24 / 4 / 1973 रोजी दिलेला हा भारतीय सर्वोच्च न्यायालयाचा एक […]
 • sanvidhanराज्यघटनेचा ‘आत्मा’.
      ‘भारतीय राज्यघटना’ ( इंडियन कॉन्स्टीट्यूशन ) म्हणजे देशाचा मूलभूत व सर्वश्रेष्ठ कायदा होय. देशाची मूलभूत बैठक निश्चित करणारी, शासनाचे अधिकार आणि जनतेचे हक्क स्पष्ट्र करणारी नियमावली म्हणजे ‘राज्यघटना’ होय. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी भारतीय […]
 • Tandoori-Chai“तंदूरी चाय ” …व्हिडीओ पाहण्यासाठी पोस्टवर क्लिक करा.
  गरमा गरम… “तंदूरी चाय “.    पर्यटकांनी भेट दिलेल्या स्थानाची वा ठिकाणाची स्मृती आपल्याजवळ कायमची राहण्यास तेथील हस्तोद्योगांचे उत्पादन, खाद्य व पेय पदार्थ, कृषी उत्पादन, मृत्तिकाशिल्प, स्मारके इत्यादि कारणीभूत ठरतात. […]
 • १२ आमदारांचे नामनिर्देशन ‘कलम १६३-१’ च्या कैचित !
    भारतीय संविधानाचे कलम १७१ प्रमाणे देण्यात आलेल्या कार्यकारी अधिकारातंर्गत जिथे द्विसदनात्मक शासन आहे तिथे विधानपरिषदेवर साहित्य, कला, विज्ञान आदी क्षेत्रातील काही सदस्यांचे नामनिर्देशन करण्याचा अधिकार त्या-त्या राज्याच्या राज्यपालास असतो. […]
 • माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे ‘‘कलम ६ (३) (एक) आणि (दोन)’’ चा वापर का करावा?
  भ्रष्टाचाराला व खाबूगिरीला लगाम घालावा, पारदर्शक प्रशासन असावे आणि सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील माहिती मिळविण्याची इच्छा असणा-या नागरिकांना विवक्षित माहिती मिळावी यासाठी एक जालीम उपाय म्हणून ‘माहितीचा अधिकार अधिनियम, २००५’ हा कायदा […]
 • Lokadalat‘लोक अदालत’ ची महती !
  ऐकावं ते नवलच आहे. लोक अदालत म्हणजे काय रं भाऊ? लोक अदालत म्हणजे लोकांची अदालत. हे एक असे न्यायालय आहे जिथे तक्रारदार, वादी आणि फिर्यादी यांनी समोरासमोर बसून न्यायिक विशेषज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चर्चा करुन कायद्याला अनुरुप पण सामांजस्याने […]
Friday
December 8, 2023
Mumbai
Sunrise: 6:59 AM
Sunset: 6:00 PM
Translate »
%d