नवी दिल्ली, 15 सप्टेंबर : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग उत्कृष्टता पुरस्कार 2020 साठी अर्ज मागवले आहेत. हे पुरस्कार दरवर्षी सहा गटात दिले जातात.
हे सहा गट म्हणजे, उत्कृष्ट प्रकल्प व्यवस्थापन, उत्कृष्ट अंमलबजावणी आणि देखरेख, हरित महामार्ग, नाविन्यपूर्ण कल्पना, उत्कृष्ट महामार्ग सुरक्षा, उत्कृष्ट टोल व्यवस्थापन आणि आव्हानात्मक परिस्थितीतील अपवादात्मक काम. या पुरस्कारासाठी तयार केलेल्या विशेष पोर्टल https://bhoomirashi.gov.in/awardsवर या महिन्याच्या 19 तारखेपर्यंत अर्ज भरून द्यावेत . या वर्षी डिसेंबरमध्ये विजेत्यांची नावे घोषित केली जातील.
ही पारितोषिके 2018 मध्ये सुरू करण्यात आली. 2018 मध्ये याच्या पहिल्या फेरीला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. या पहिल्या फेरीनंतर मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग उत्कृष्टता पारितोषिक हे दर वर्षी देण्याचा निर्णय घेतला.
बांधकाम व्यवस्थापन, देखभाल तसेच टोल जमा करणं , महामार्गाची सुरक्षितता या महामार्ग व्यवस्थापनामधील कळीच्या गोष्टी आहेत . यात उत्कृष्ट काम करणाऱ्या कंपन्या शोधणे हे यामागचे उद्दिष्ट आहे.
ही पारितोषिके दरवर्षी दिली जाण्याचे उद्दिष्ट म्हणजे त्यानिमित्ताने महामार्ग व्यवस्थापनातील विविध कंपन्यांमध्ये निरोगी स्पर्धा निर्माण व्हावी तसेच रस्ते वाहतूकीचे जाळे विस्तारण्याच्या कामी संबंधितांचे हातभार लागावेत हे होय.
दरवर्षी या पारितोषिकांची घोषणा होत असल्यामुळे वेगवेगळ्या परिस्थितीत महामार्ग व्यवस्थापनात अपवादात्मकरित्या उत्कृष्ट काम करणार्यांना मंत्रालयाकडून ओळख मिळावी. तसंच सेवा देतानाही त्यात उत्कृष्टतेचा ध्यास घेणाऱ्या कंपन्यां समजाव्यात असा यामागे मंत्रालयाचा उद्देश आहे.
Add Comment