महाराष्ट्र राज्य पत्रलेखन-कविता

कल्याण – डोंबिवली येथे कोविड समर्पित काळजी केंद्र, चाचणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

Opening image
कल्याण - डोंबिवली कोविड केंद्र, उदघाटन फोटो.
Covid Centre image

कल्याण – डोंबिवली कोविड केंद्र, उदघाटन फोटो

केवळ सुविधाच नव्हे तर वेळीच रुग्ण सेवा, योग्य उपचार मिळण्यास प्राधान्य द्यावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

      मुंबई, दि. 25 : कल्याण येथील कोविड चाचणी प्रयोगशाळा आणि कल्याण तसेच डोंबिवली येथील समर्पित कोविड काळजी केंद्रांचे ऑनलाईन उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते.  यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विशेषतः मुंबई महानगर क्षेत्र परिसरात कोविडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.  कोरोना संकटात  महाराष्ट्र शासन खंबीर आहे. आरोग्याच्या  सर्व सुविधा जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी तसेच  व्हायरस प्रसाराला अटकाव करण्यासाठी  एकत्रित दर्जेदार  सुविधा निर्माण करण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर ट्रेसिंग करण्यावर भर देण्यात यावा अशा सुचना त्यांनी दिल्या.

रुग्ण सेवा अधिक महत्वाची:  केवळ मोठमोठया सुविधा उभारून चालणार नाही, तर योग्य पद्धतीने रुग्ण सेवा, वैद्यकीय उपचार, पुरेशी ऑक्सिजन व्यवस्था  तात्काळ उपलब्ध होणे गरजेचे आहे यावर भर  देण्यास सांगितले.

ढिलाई नको:  संपूर्ण जगावर कोरोनाचे मोठे संकट आले. आज आपण  या संकटाचा समर्थपणे मुकाबला करत आहे. आरोग्याच्या सुविधा वाढवत आहोत, ही समाधानाची बाब असून रुग्णांचा शोध, तपासणी व उपचार या बाबींवर भर देण्यात येत आहे. राज्यात 131 प्रयोग शाळा उभारण्यात आल्या आहेत.  कोरोना बाधितांवर उपचारासाठी काही ठिकाणी आरोग्य सुविधांची  तात्पुरत्या स्वरूपात उभारणी करण्यात आली असून येणाऱ्या काळात या सुविधा कायम स्वरूपी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आरोग्य सुविधा आणि साथीचे प्रमाण व्यस्त आहे.  प्रभावी औषधे हातात येईपर्यंत आपल्याला अधिक सजग असणे आवश्यक आहे. गलथानपणा, ढिलाई आपल्याला परवडणारी नाही. आपल्याकडे सुरु असलेल्या  उपचारांची गाईडलाईन तपासुन घेणे आवश्यक आहे. राज्याच्या टास्कफोर्स कडून संबंधित यंत्रणेला मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.  या संकटात सर्व यंत्रणा  न डगमगता  पाय रोवून उभे राहिलात त्यामुळे तुमचे मन:पूर्वक धन्यवाद देतो असे सांगुन  ते म्हणाले की,संपूर्ण राज्यात जेथे  आवश्यकता असेल तेथे प्रयोगशाळा तसेच आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वोतोपरी सहाय्य देण्यात येईल. कोरोना व्हायरसला हरविणे हे आपल्यासमोरील मोठे आव्हान असले तरी आपण एकजुटीने त्यावर मात करु असा विश्वासही मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला. कोरोनाच्या बाबत नागरिकांच्या मनातील भय दुर करण्याबरोबरच त्यांना दिलासा देण्याबरोबरच  समुपदेशन उपलब्ध करुन देण्यात यावे असेही त्यांनी सांगितले.डोंबिवली पूर्व येथील दावडी गावात कच्छी कडवा पाटीदार समाज, मुंबई यांनी पाटीदार भवनाची प्रशस्त जागा महापालिकेस उपलब्ध करुन दिली असून सदर इमारत ही तळ + 4 मजल्याची आहे. पहिल्या मजल्यावरील सुमारे 5000 स्क्वे.फीट च्या प्रशस्त जागेत 70 बेड त्यापैकी 60 ऑक्सिजन सुविधा असलेले व 10 सेमी आयसीयू बेड असणार असून दुस-या मजल्यावर काम करणारे डॉक्टरर्स, त्यांचा रहिवास, रेस्ट रुम, त्यांचे कार्यालय असणार आहे. तिस-या मजल्यावरती 5000 स्के.फीट च्या प्रशस्त जागेत ऑक्सिजन सुविधा असलेले 70 बेड व 4 थ्या मजल्यावर देखील ऑक्सिजन सुविधा असलेले 70 बेड रुग्णांकरीता उपलब्ध असणार आहेत. बेसमेंटमध्ये कँन्टींग सुविधा उपलब्ध असून सीसीटीव्ही कॅमेरे व रुग्णांकरीता उदवाहन देखील पाटीदार समाजाने पुरविले आहे. सदर रुग्णालयात रुग्णांसाठी पंखे, वॉयफाय सिस्टिम तसेच रुग्णांचे तणावरहीत वातावरणात राहण्यासाठी मंद सुरावटीची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. सदर रुग्णालयात 1 रुपी क्लिनीक डॉ. राहुल घुले यांचेमार्फत चालविण्यात येणार असून एकुण 2 एमडी फिजीशियन, 25 निवासी डॉक्टर ,50परिचारिका व 30 हाऊसकिपींगचा स्टाफ रुग्णांचा सेवेसाठी तैनात राहणार आहे.

कोविड आरोग्य केंद्र कल्याण:   कल्याण पश्चिम येथील आसरा फाऊंडेशनच्या प्रशस्त जागेत कोव्हिड आरोग्य केंद्र उभे राहत असून त्यामध्ये 100 ऑक्सिजनचे बेड, 84नार्मल बेड ,10सेमी आयसीयू बेडची सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. या सेंटर मध्ये 12 डॉक्टरर्स, 20 नर्सेस, 20 वॉर्ड बॉय आणि फिजीशियन देखील उपलब्ध असतील

कल्याण येथे सुसज्ज प्रयोगशाळा:  कल्याण पश्चिम गौरीपाडा येथे महापालिकेचे स्वत:चे सुसज्ज स्वॅब चाचणी केंद्र पी.पी.पी. तत्वावर क्रष्णा डायग्नोस्टिक यांच्या माध्यमातून तयार होत असून तेथे दररोज 3000 चाचण्या होवू शकतात.  यावेळी पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कोरोनाची आव्हान पेलण्यासाठी ठाणे जिल्हा सज्ज असून येणाऱ्या काळात या भागातील संसर्ग परिणामकारकरित्या रोखू तसेच उत्तम सुविधांची उभारणी करू असा विश्वास व्यक्त केला. कल्याण डोंबीवली महापालिका परिसरात रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढविले आहे.  महापालिका व लोकप्रतिनिधी एकत्र मिळुन  काम करतायेत त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळतो आहे असे सांगितले. तसेच महापालिकांना अर्थिक मर्यादा आहेत परंतु मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक त्या सुविधा   उपलब्ध होत आहेत. ट्रँकींग व ट्रेसिंगवर विशेष भर देण्यात येत असुन येथील नागरिकांना सर्व सुविधा कल्याणमध्येच उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्याचेही श्री शिंदे यांनी  सांगितले.  मनपा आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका काय उपाययोजना करीत आहे त्याविषयी सांगितले.  यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, सर्वश्री आमदार राजू पाटील,विश्वनाथ भोईर,रवींद्र चव्हाण महापौर विनिता राणे,सभापती स्थायी समिती विकास म्हात्रे,विरोधी पक्ष नेते राहुल दामले, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांसह नगरसेवक, मनपा अधिकारी उपस्थित होते.

About the author

ACHUKVARTA

Add Comment

Click here to post a comment

: नविनतम पोस्ट्स :

  • dharmantaranधर्मांतरण, निकाह, एस. सी. व्यक्ती आणि त्याच्या धर्मांतरणासमोरील अडचणी.
    एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ‘कार्डेलिया क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात’ आर्यन खान याला अटक केल्यानंतर त्यांनी अनुसूचित (एस.सी) जातीच्या आधारे मिळवलेली सरकारी नोकरी कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विद्यमान […]
  • Keshvanand-Bharti-Caseभारतीय संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यातील ‘सत्तेचा समतोल’ साधणारा ‘केशवानंद भारती खटला’
        “केशवानंद भारती श्रीपादगलवारू आणि इतर” विरुद्ध “केरळ राज्य आणि इतर” (रिट पिटिशन (सिव्हिल)  135 ऑफ1970), ज्याला‘केशवानंद भारती निर्णय’ म्हणूनही ओळखले जाते, दि. 24 / 4 / 1973 रोजी दिलेला हा भारतीय सर्वोच्च न्यायालयाचा एक […]
  • sanvidhanराज्यघटनेचा ‘आत्मा’.
        ‘भारतीय राज्यघटना’ ( इंडियन कॉन्स्टीट्यूशन ) म्हणजे देशाचा मूलभूत व सर्वश्रेष्ठ कायदा होय. देशाची मूलभूत बैठक निश्चित करणारी, शासनाचे अधिकार आणि जनतेचे हक्क स्पष्ट्र करणारी नियमावली म्हणजे ‘राज्यघटना’ होय. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी भारतीय […]
  • Tandoori-Chai“तंदूरी चाय ” …व्हिडीओ पाहण्यासाठी पोस्टवर क्लिक करा.
    गरमा गरम… “तंदूरी चाय “.    पर्यटकांनी भेट दिलेल्या स्थानाची वा ठिकाणाची स्मृती आपल्याजवळ कायमची राहण्यास तेथील हस्तोद्योगांचे उत्पादन, खाद्य व पेय पदार्थ, कृषी उत्पादन, मृत्तिकाशिल्प, स्मारके इत्यादि कारणीभूत ठरतात. […]
  • १२ आमदारांचे नामनिर्देशन ‘कलम १६३-१’ च्या कैचित !
      भारतीय संविधानाचे कलम १७१ प्रमाणे देण्यात आलेल्या कार्यकारी अधिकारातंर्गत जिथे द्विसदनात्मक शासन आहे तिथे विधानपरिषदेवर साहित्य, कला, विज्ञान आदी क्षेत्रातील काही सदस्यांचे नामनिर्देशन करण्याचा अधिकार त्या-त्या राज्याच्या राज्यपालास असतो. […]
  • माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे ‘‘कलम ६ (३) (एक) आणि (दोन)’’ चा वापर का करावा?
    भ्रष्टाचाराला व खाबूगिरीला लगाम घालावा, पारदर्शक प्रशासन असावे आणि सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील माहिती मिळविण्याची इच्छा असणा-या नागरिकांना विवक्षित माहिती मिळावी यासाठी एक जालीम उपाय म्हणून ‘माहितीचा अधिकार अधिनियम, २००५’ हा कायदा […]
  • Lokadalat‘लोक अदालत’ ची महती !
    ऐकावं ते नवलच आहे. लोक अदालत म्हणजे काय रं भाऊ? लोक अदालत म्हणजे लोकांची अदालत. हे एक असे न्यायालय आहे जिथे तक्रारदार, वादी आणि फिर्यादी यांनी समोरासमोर बसून न्यायिक विशेषज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चर्चा करुन कायद्याला अनुरुप पण सामांजस्याने […]
Friday
December 8, 2023
Mumbai
Sunrise: 6:59 AM
Sunset: 6:00 PM
Translate »
%d